Skoda Kylaq
स्कोडा क्ल्याक ही एक उत्तम कॉम्पॅक्ट SUV आहे. जी अनेक चांगल्या फीचर्ससह येते. त्याची किंमत 7.89 लाख रुपये ते 14.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, स्कोडा क्विलाकमध्ये 1.0L लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन आहे जे 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6स्पीड मॅन्युअल आणि डीसीटी ट्रान्समिशनच्या ऑप्शनसह येते. यात प्रीमियम इंटीरियरसह दोन्ही फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत.
advertisement
आता कार ACची सर्व्हिसिंग होईल फ्री! या कंपनीने सुरु केलाय सर्व्हिस कँप
Tata Punch
टाटाच्या पंच इलेक्ट्रिकमध्ये तुम्हाला हवेशीर जागांचा ऑप्शन देखील मिळतो. त्याची किंमत 12.84 लाख रुपयांपासून ते 14.44 लाख रुपयांपर्यंत आहे. ही सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे जी अनेक चांगल्या फीचर्ससह येते. पंचमध्ये दोन बॅटरी ऑप्शन आहेत. पूर्ण चार्ज केल्यावर 365km पर्यंतची रेंज देते. Empowered+ ट्रिममध्ये व्हेंटिलेटेड सीट्स उपलब्ध आहेत. पंचची डिझाइन थोडी चांगली असू शकते.
Honda ने टाकला मोठा डाव, 'ती' स्कुटर नव्या रुपात नव्या ढंगात केली लाँच, किंमतही कमी..
Tata Nexon
टाटा नेक्सॉनला फक्त टॉप-स्पेक फियरलेस+ पीएस मॉडेलमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स मिळतात. त्याची किंमत 13.30 लाख ते 15.60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंट ऑप्शन देखील आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये 120 hp इंजिन आहे. तर डिझेलमध्ये 115 hp इंजिन ऑप्शन आहे. सीएनजी प्रकारात 100hp इंजिन आहे.