BH नंबर प्लेटमध्ये एक यूनिक रजिस्ट्रेशन नंबर असतो. हे संपूर्ण भारतात एका वैयक्तिक वाहनाला दिले जाते. यामुळे, वाहन मालक एकाच नोंदणी क्रमांकाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकतील. याशिवाय, विम्याच्या दृष्टिकोनातून बीएच नंबर प्लेट असणे देखील सोयीस्कर आहे. कारण, कार विम्यावर याचा परिणाम होत नाही. त्याच्या स्वरूपाबद्दल बोलायचे झाले तर, त्यात नोंदणीचे वर्ष (YY), नंतर BH (भारत मालिका), नंतर 4 अंकी नोंदणी क्रमांक आणि नंतर XX आहे. हे व्हिकल कॅटेगिरी दर्शवते. उदाहरणार्थ आपण 22BH 9999AA पाहू शकतो.
advertisement
'हे' लोक राहा टेन्शन फ्री! त्यांना HSRP नंबर प्लेटची गरजच नाही, यात तुम्ही आहात?
स्टेट रजिट्रेशन नंबरबाबत बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमचे ठिकाण बदलले तर नवीन राज्यात गेल्यानंतर १२ महिन्यांच्या आत तुम्हाला वाहन नोंदणी बदलावी लागेल. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करू शकता. यामुळे तुमचा कार विमा दावा नाकारला जाऊ शकतो. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे विमा कंपनी कार विम्याचा दावा नाकारू शकते. तसंच, BH क्रमांकासह तुम्हाला ही समस्या येत नाही. कारण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना तुम्हाला वाहन नोंदणी बदलण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत, कार विमा संरक्षण किंवा दाव्याच्या वैधतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
कार खरेदी करायचा 20-4-10 रूल माहितीये का? कळल्यास होईल फायदाच फायदा
BH सिरीज नंबर प्लेटसाठी कोण पात्र आहे आणि त्याचे निकष काय आहेत?
- राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी.
- संरक्षण कर्मचारी.
- बँक कर्मचारी.
- प्रशासकीय सेवेतील कर्मचारी
- पाचपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी.
- वाहनाकडे प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
- वाहनासाठी रोड टॅक्स भरावा लागेल.
- हे फक्त नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांना लागू होते.
भारत सिरीज नंबर प्लेटचे फायदे:
- ही नंबर प्लेट संपूर्ण देशभर वैध आहे.
- एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
BH सिरीज नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन कसे करावी:
- यासाठी, तुम्ही MoRTH च्या वाहन पोर्टलवर स्वतः लॉग इन करू शकता. किंवा तुम्ही कोणत्याही अधिकृत ऑटोमोबाईल डीलरची मदत घेऊ शकता.
- जर तुम्ही ऑटोमोबाईल डीलरची मदत घेतली तर वाहन पोर्टलमध्ये फॉर्म 20भरा.
- पात्र खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फॉर्म 60 भरणे आवश्यक आहे. त्यांना कामाच्या प्रमाणपत्रासोबत रोजगार ओळखपत्र देखील दाखवावे लागेल.
- यानंतर ऑथोरिटीज वाहन मालकाची पात्रता पडताळतात.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
- यानंतर, BH क्रमांकासाठी RTOकडून मंजुरी मिळाल्यानंतर, आवश्यक मोटार वाहन कर भरावा लागेल.
- त्यानंतर वाहन पोर्टल तुमच्या वाहनासाठी BH Series रजिस्ट्रेशन जनरेट करते.