TRENDING:

Volkswagenची मेगा प्लॅनिंग! 5 नव्या गाड्या लॉन्च करणार कंपनी, पाहा डिटेल्स 

Last Updated:

Volkswagen ने Tayron R-Line, Taigun Facelift, Virtus Facelift, Golf GTI आणि Tayron सह 5 नव्या गाड्या भारतीय बाजारात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. चला याच्या संभाव्य किंमती आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Volkswagen ने या वर्षी भारतीय ऑटो मार्केटमध्ये 5 नवीन गाड्या सादर करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकतीच ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये कंपनीने प्रत्येक तिमाहीमध्ये किमान एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याची योजना बनवली आहे. हे पाऊल भारतीय बाजारामध्ये आपली उपस्थिती मजबुत करणे आणि ग्राहकांना सतत नवीन पर्यात प्रदान करण्याचा भाग आहे.
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

यामध्ये प्रामुख्याने Tayron R-Line, Taigun Facelift, Virtus Facelift, Golf GTI (दुसरी बॅच) आणि Tayron चा समावेश आहे. ही एसयूव्ही सेडान आणि हॅचबॅक सेगमेंटला कव्हर करते. ज्यामध्ये प्रीमियम फीचर्स, बेस्ट परफॉर्मेंस आणि जर्मन इंजीनियरिंगचं मिश्रण असेल. Tayron R-Line ला पहिलेच अनवील केलं गेलं आहे. जी कंपनीची नवीन फ्लॅगशिप 7-सीटर SUV आहे. चला पांचही अपकमिंग कारविषयी जाणून घेऊया.

advertisement

28KM मायलेज, 6 एअरबॅगसह सनरुफ! या Hybird SUV वर मिळतेय 55 हजार रुपयांची सूट

VW Tayron R-Line

कंपनीचे पहिले प्रोडक्ट म्हणजे Tayron R-Line. ही एक प्रीमियम 7-सीटर एसयूव्ही आहे जी टिगुआन आर-लाइनच्या वर आहे आणि टिगुआन ऑलस्पेसची जागा घेईल. एमक्यूबी ईव्हीओ प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या, टायरॉन आर-लाइनमध्ये स्पोर्टी आर-लाइन डिझाइन, एलईडी मॅट्रिक्स हेडलाइट्स, एक मोठे पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल-2 ADAS सारखे फीचर्स आहेत.

advertisement

हे इंजिन 2.0-लिटर TSI टर्बो-पेट्रोल आहे, जे 204 hp आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते, 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4MOTION AWD सह जोडलेले आहे. ते टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर आणि जीप मेरिडियन सारख्या स्पर्धकांशी स्पर्धा करेल. अपेक्षित किंमत सुमारे ₹45-50 लाख (एक्स-शोरूम) असू शकते.

VW Tayron

यानंतर Tayron चा स्टँडर्ड व्हेरिएंटही येईल. जो Q2 2026 मध्ये लॉन्च होण्यास तयार आहे. ही टू रोची मिड-साइज एसयूव्ही असेल. ज्यामध्ये संभाव्य 1.5 -लीटर TSI इंजिन असेल. जे कमी किंमतीत प्रीमियम एक्सपीरियन्स देईल. ज्यांना 7-सीटरची आवश्यकता नाही अशा ग्राहकांना लक्ष्य केले जाईल.

advertisement

'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Automatic Car, किंमत फक्त 4.75 लाखांपासून सुरु

VW Taigun Facelift

तिसरे प्रमुख प्रोडक्ट VW Taigun Facelift असेल. फेसलिफ्टमध्ये नवीन फ्रंट-रीअर डिझाइन, अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम (10.1-इंच टचस्क्रीन), डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि शक्यतो एडीएएस फीचर्सचा समावेश असेल. इंजिन 1.0-लिटर आणि 1.5-लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन असतील, तर 1.0-लिटरमध्ये 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक असण्याची शक्यता आहे. अपेक्षित किंमत ₹12-21 लाख दरम्यान असेल.

advertisement

VW Virtus Facelift

त्याच प्रमाणे Virtus Facelift ही तिसऱ्या तिमाहीमध्ये लॉन्च होऊ शकते. Virtus प्रीमियम सेडान आहे. ज्यामध्ये स्पेसियस केबिन आणि मजबूत बिल्ड क्वालिटी आहे. फेसलिफ्टमध्ये नवीन बंपर, ग्रिल, LED लाइट्स आणि अपग्रेडेड फीचर्ससारखे वायरलेस चार्जिंग, बेस्ट साउंड सिस्टम असतील. इंजिन ऑप्शन तेच राहतील. यामध्ये 1.0-लीटर आणि 1.5-लीटर TSI चा समावेश आहे. किंमत ₹12-18 लाखांच्या रेंजमध्ये असू शकते.

VW Golf GTI

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी हेल्दी, घरच्या घरी बनवा पालक कटलेट रेसिपी, संपूर्ण Video
सर्व पहा

कंपनी या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत VW गोल्फ GTI ची दुसरी बॅच लाँच करणार आहे. पहिली बॅच लवकर संपली, म्हणून कंपनी दुसरी बॅच आणत आहे, ज्यामध्ये सुमारे 100 युनिट्स असण्याची अपेक्षा आहे. या आयकॉनिक हॉट हॅचबॅकमध्ये 2.0-लिटर TSI इंजिन आहे जे 265 एचपी पॉवर देते, 7-स्पीड DSG सह जोडलेले आहे. फीचर्समध्ये 12.9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ADAS आणि पॅनोरॅमिक सनरूफ समाविष्ट आहेत. किंमत सुमारे ₹50-55 लाख असण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Volkswagenची मेगा प्लॅनिंग! 5 नव्या गाड्या लॉन्च करणार कंपनी, पाहा डिटेल्स 
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल