डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ प्लॅनमुळे जपान, कोरिया आणि जर्मनीतील ऑटो सेक्टरवर परिणाम झासला आहे. कारण टोयोटा, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, हुंदई आणि फॉक्सवॅगन सारख्या कार उत्पादक कंपन्या या आपल्या कार अमेरिकेला निर्यात करत असतात. आता यामुळे भारतीय कंपन्यांनाही याचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय कार उत्पादक कंपन्यावर कसा होणार परिणाम
भारतीय कंपन्या जशा, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि आयशर मोटर्स यांच्यावर टॅरिफ प्लॅनचा परिणाम होणार आहे. अमेरिकेत टाटा मोटर्सच्या मालकी असलेल्या Jaguar जॅगुआर आणिLand Rover लँड रोव्हर गाड्यांचा चांगली मागणी आहे. तर आयशर मोटर्सच्या रॉयल एनफिल्ड बाइक्सचीही चांगली मागणी आहे. पण अमेरिकेत विक्री होणाऱ्या टाटा मोटर्सच्या जगुआर आणि लँड रोव्हरची निर्मिती ही युकेमध्ये होते किंवा युरोपमध्ये कारचं उत्पादन होत असतं.
advertisement
अमेरिकेत थांबवली निर्यात
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारणामुळे Jaguar Land Rover (JLR) ने ब्रिटेनमध्ये तयार होणारी Jaguar आणि Land Rover कारचं अमेरिकेत निर्यात थांबवली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सोमवारपासून JLR ने अमेरिकेत जाणारं शिपमेंट तुर्तास थांबवलं आहे, कारण इम्पोर्ट टॅक्स किती कमी करता येईल याचा विचार करत आहे. अशातच टाटा मोटर्सवर किती परिणाम होईल, याची माहिती अद्याप समोर आली नाही.
महिंद्रा कंपनीच्या गाड्या होतील महाग
तर भारतीय महिंद्रा कंपनी अमेरिकेतील काही भागांमध्ये कारची विक्री करत असते. या टॅरिफमुळे भारतात तयार होणाऱ्या कार अमेरिकेत महाग होणार आहे. तसंच या टॅरिफमुळे कारचं कम्पोनेट तयार करणाऱ्या कंपन्यांवरही याचा परिणाम होईल. कारण भारतातील अनेक कंपन्या या अमेरिकेत ऑटो पार्ट्स निर्यात करत असते.