TRENDING:

EV Car: इलेक्ट्रिक वाहनं सर्वात जास्त धोकादायक, प्रदूषण कमी नव्हे वाढणार, जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा दावा

Last Updated:

तुम्ही कधी विचार केला आहे का की, ईव्ही वापरून प्रदूषण खरोखरच रोखता येईल का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ईलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यास पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेक देश आणि सरकार हे ईलेक्ट्रिक वाहनासाठी नवीन धोरणं तयार करत आहे. भारतासारख्या देशात जिथे प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे, तिथे वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ईव्हीवर विशेष भर दिला जात आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ईव्ही वापरून प्रदूषण खरोखरच रोखता येईल का? जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाच्या अध्यक्षांनी ईव्ही गाड्यांमुळे मोठा धोका आहे, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता एक नवा वाद पेटला आहे.
advertisement

जगभरात दणकट आणि दमदार अशी गाड्यांची निर्मिती करणारी कंपनी म्हणून टोयोटाला ओळखलं जातं. पण   टोयोटा कंपनीचे अध्यक्ष अकिओ टोयोडा यांनी ऑटोमोटिव्ह न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ईलेक्ट्रिक वाहनांबद्दल वेगळीच भूमिका मांडली. 'केवळ ईव्हीचा अवलंब केल्याने कार्बन उत्सर्जन कमी होणार नाही; उलट ते आणखी वाढेल. बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (BEVs) शून्य टेलपाइप उत्सर्जन असतं हे कोणीही नाकारत नाही, परंतु आपण हे का विसरतो की, बहुतेक वीज औष्णिक वीज केंद्रांमधूनच निर्माण होते, असं परखड मत अकिओ टोयोडा यांनी मांडलं.

advertisement

...म्हणून टोयोटा ईव्हीपासून दूर

गेल्या काही वर्षांत, ऑटो क्षेत्रात ईव्ही सेगमेंट वेगाने वाढले आहे, परंतु टोयोटाने इलेक्ट्रिक वेव्हपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या क्षेत्रात सावधगिरीने पावले उचलली आहेत, परंतु कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्यासाठी पुढील पाऊल म्हणजे हायब्रिड दृष्टिकोन असा तिचा विश्वास आहे. टोयोटा हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड, हायड्रोजन फ्युएल सेल आणि ईव्ही असे अनेक पर्याय देते.  'टोयोटा कंपनीने आपली सर्व गुंतवणूक ईव्हीमध्ये का गुंतवली नाही. प्रत्येकजण ईव्हीच्या फक्त एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करत आहे आणि ते म्हणजे शून्य टेलपाइप उत्सर्जन, परंतु वीज कशी निर्माण केली जाते हे कथेची दुसरी बाजू दर्शवते, जी पुरेशी अधोरेखित केलेली नाही. औष्णिक वीज केंद्रांमधून निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो' असंही ते म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

"कार्बन उत्सर्जन हा शत्रू आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी बहु-ऊर्जा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. सध्या, भारतातील उत्तर प्रदेश हायब्रिड वाहनांवर रोड टॅक्समध्ये सूट देते. जर एखाद्याला इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) वरून अपग्रेड करायचे असेल तर हायब्रिड हा एक व्यावहारिक पर्याय असू शकतो, कारण ते EV पेक्षा तुलनेने स्वस्त आहेत आणि त्यांना रेंजची चिंता नाही' असा पर्यायही त्यांनी सुचवला.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
EV Car: इलेक्ट्रिक वाहनं सर्वात जास्त धोकादायक, प्रदूषण कमी नव्हे वाढणार, जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल