पतंजलीकडून स्कुटर नाहीच!
काही आठवड्यांपूर्वी, पतंजली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत असल्याची बातमी इंटरनेटवर व्हायरल झाली होती. आता, पतंजली ब्रँडला कोणत्याही ओळखीची गरज नाही, पण, औषधं, साबण, सौंदर्यप्रसाधने इत्यादी आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये काम करणारी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवणे ही कल्पना वाटतं आणि ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.
EVMechanica नावाच्या साईटवर आली बातमी
advertisement
काही वेबसाइट्सनी पतंजलीच्या या ई-स्कूटरबद्दल काही तपशील शेअर केली होती. EVMechanica या वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे पतंजली ई-स्कूटरची काही माहिती इथं आहे. या स्कुटरचे स्पेसिफिकेशन ही देण्यात आले होते. ही स्कुटर कमाल ४४० किमी रेंज, लिथियम आयन बॅटरी, ४ ते ५ तास चार्जिंग वेळ, टॉप स्पीड ६० किमी प्रतितास, किंमत १४,००० रुपये, वजन ७५-८० किलो, ब्रेकिंग सिस्टम ड्रम (समोर आणि मागील) रंग पर्याय पांढरा, निळा, राखाडी, काळा असं स्पेसिफिकेशनही देण्यात आलं होतं. आता हे फिचर्स चांगले असले तरी कुणालाही याच्यावर विश्वास बसणार नाही. सुरुवातीला, स्कूटर एका चार्जवर ४४० किमीची रेंज देण्याचा दावा केला.. भारतातील इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सर्वाधिक दावा केलेली सिंगल-चार्ज रेंज सिंपल वनने २४८ किमी केली आहे, जी देशातील कोणत्याही माध्यमांनी अद्याप वास्तविक-जगातील रेंजसाठी चाचणी केलेली नाही.
किंमत १४,००० रुपये
पतंजलीची सुरुवातीची किंमत १४,००० रुपये असल्याचं म्हटलं जातं आहे, जी सरासरी मध्यम बजेट स्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे. १ एप्रिल रोजी जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा एप्रिल फूल तर नाही ना, असं वाटणं साहजिक होतं. पण ही बातमी एका महिन्यानंतर आली. जेव्हा पतंजली कंपनीकडून आणि त्यांच्या संकेतस्थळाकडून स्कुटरबद्दल काही माहिती दिली आहे, याची पडताळणी केली असता अशी कोणतीही माहिती कंपनीकडून दिलेली नाही. त्यामुळे ही बातमीमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही. ही बातमी खोटी असल्याचं फॅक्ट चेकमध्ये निष्पन्न झालं.