हा नियम विशेषतः 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी आहे हा निर्णय घेण्यात आला आहे. HSRP नंबर प्लेट नसेल कर 30 जूननंतर दंड आकारला जाणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट पूर्णपणे बेकायदेशीर ठरतील, कारण काही डिझाइन वाचायला कठीण असतात. अंतिम मुदत संपल्यानंतर, अनधिकृत नंबर प्लेट वापरल्यास मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 177 अंतर्गत 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल.
advertisement
काय आहे हाय-सिक्योरिटी नंबर प्लेट?
HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात 10 अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. यामुळे ही प्लेट छेडछाड करणे शक्य नसते. ही प्लेट दुर्मिळ ॲल्युमिनियम धातूपासून बनलेली असते आणि त्यावर 'IND' बॅजिंग असते, ज्यावर अशोकचक्राचे होलोग्राम हॉट-स्टॅम्प केलेले असते. याव्यतिरिक्त, प्लेटवर रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते, ज्यावर "INDIA" असे नमूद केलेलं असतं.
HSRP कोठून लावावी?
नवीन गाड्यांमध्ये HSRP पूर्वीपासूनच लावलेली असते. पण 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही प्लेट वेगळी लावावी लागेल. महाराष्ट्रातील वाहन मालकांना HSRP फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच लावावी लागेल, जे परिवहन विभागाकडे नोंदणीकृत आहेत. अधिकृत विक्रेत्यांची यादी VAHAN पोर्टलवर उपलब्ध आहे. या पोर्टलवरून माहिती घेऊन वाहन मालक आपल्या गाडीसाठी HSRP बुक करू शकतात. त्यामुळे ज्यांच्या गाड्यांना अजून HSRP लागलेली नाही, त्यांनी आता दिलेली मुदत लक्षात घेऊन त्वरित HSRP लावून घ्यावी, जेणेकरून त्यांना दंड टाळता येईल.