TRENDING:

भारतात आजपर्यंत कधीच अशी कार पाहिली नसेल, येतेय 770 किमी रेंजची Jaguar future car

Last Updated:

भारतीय मार्केटला लक्ष्यात ठेवून या Jaguar Type 00 ची झलक एका विशेष अशा कार्यक्रमात पाहण्यास मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Jaguar Type 00 नेमकं काय?

जग्वार टाइप 00 ही केवळ एक कन्सेप्ट कार जरी असली तरी लवकरच याच प्लॅटफॉर्मवर खरी कार रस्त्यावर धावताना दिसणार आहे.  जग्वारने  भविष्यातली कार कशी असेल याची झलक दाखवली आहे.  ही कार कंपनीला एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी  डिझाइन, कामगिरी आणि टेक्नॉलॉजी या तिन्ही पैलूंमध्ये गेम चेंजर ठरू शकते.

advertisement

प्युअर इलेक्ट्रिक जीटी कूप डिझाइन लांब बोनेट आणि उतार असलेल्या छतासह ही कार हटके अशीच आहे.  या कारची रचना ही  मजबूत आणि दमदार डिझाइनवर आधारीत आहे.  जेईए प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि Jaguar Type 00 ची रेंज ७७० किमी इतकी आहे.

advertisement

मुंबईत होणार लाँच

भारतीय मार्केटला लक्ष्यात ठेवून या Jaguar Type 00 ची झलक एका विशेष अशा कार्यक्रमात पाहण्यास मिळणार आहे.   हा कार्यक्रम भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण उत्पादनापूर्वी ही कार भारतात पाहण्यास मिळणार आहे. Jaguar  ग्रुप भारतासारख्या बाजारपेठेला किती महत्त्व देत आहे, हे देखील यातून दिसून येते.

Jaguar Type 00 लाँच झाल्यानंतर जगभरातून आतापर्यंत ३२,००० हून अधिक लोकांनी ही कार विकत घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. तुर्तास या कारची विक्री अद्याप सुरू झालेली नाही.

advertisement

उत्पादन कधी सुरू होईल?

Jaguar Type 00 ची उत्पादन आवृत्ती 2025 च्या अखेरीस सुरू होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केली जाईल  आणि त्यानंतर 2026 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. पोर्श टायकन आणि टेस्ला मॉडेल एस सारख्या उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिक कारशी ही कार स्पर्धा करेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

Jaguar Type 00 कार जग्वार ब्रँडला 'अल्ट्रा-लक्झरी' सेगमेंटमध्ये घेऊन जातेय. कारची रचना अशी आहे जी फ्युचर कन्सेप्ट कार सारखं आहे.  जग्वार केवळ ईव्ही क्षेत्रात टिकून राहण्याचा प्रयत्न करत नाही तर या सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याचा प्लॅन आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
भारतात आजपर्यंत कधीच अशी कार पाहिली नसेल, येतेय 770 किमी रेंजची Jaguar future car
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल