दुसऱ्या युद्धात वापरली होती willys 41
जीप कंपनीची willys ही दुसऱ्या महायुद्धात वापरली गेली होती. या कारची प्रेरणा घेऊन ही wrangler willys 41 लाँच करण्यात आली आहे. 1941 मिलिट्री ग्रीन या रंगातच ही एसयूव्ही पाहण्यास मिळत आहे. या रंगामध्ये जीपची एसयूव्ही भारतात पहिल्यांदाच पाहण्यास मिळत आहे. हा रंग फक्त wrangler willys 41 मध्ये दिला जाणार आहे. रूबिकॉन व्हेरिएंटवर उभारलेली wrangler willys 41 स्पेशल एडिशनमध्ये अनेक प्रॅक्टिकल आणि प्रीमियम अपग्रेड्स दिले आहे. पॉवर-ऑपरेटेड साइड स्टेप्स, ऑल-वेदर फ्लोर मॅट्स, फ्रंट आणि रिअर पॅसेंजर्ससाठी ग्रॅब हँडल्स, आणि फ्रंट आणि रिअर डिजिटल व्हीडिओ रिकॉर्डर्स.
advertisement
ऑप्शनल पॅक
जीपमध्ये एक ऑप्शनल अॅडव्हेंचर पॅक दिला आहे. ज्यामध्ये रूफ कॅरिअरसह इंटिग्रेटेड साइड स्टेप्स आणि सनराइडर रूफ दिला आहे. हा स्टँडर्ड रूबिकॉन व्हेरिएंटपेक्षा 1.51 लाख रुपये जास्त आहे. तसंच अडव्हेंचर पॅकेजसाठी अतिरिक्त 4.56 लाख रुपये खर्च येईल. या एसयूव्हीची किंमत 67.75 लाख (एक्स शोरुम) आहे.
'ही एक स्पेशल एडिशन आहे. ही जीप स्वतंत्रता आणि प्रामाणिकपणाच्या इतिहासासाठी श्रद्धांजली आहे. wrangler willys 41 एडिशन हे एक ऐतिहासिक आधुनिक रुप आहे. जे जीप वाहन चालवणारे किंवा चााहते आहे त्यांच्यासाठी ही खास भेट आहे. भारतात ही कार मोजकेच दिवस डीलशिप्समध्ये उपलब्ध असणार आहे, असं जीप इंडियाचे व्यस्थापक कुमार प्रियेश यांनी सांगितलं.