Carens पेक्षा दमदार मॉडेल
MPV Kia India च्या उत्पादनामध्ये Carens आता सगळ्यात प्रीमियम मॉडेल म्हणून आणणार आहे. या कारचं डिझाइन हे वेगळं असणार आहे. या टिझरमधून नवीन Clavis चा लूक हा Carens पेक्षा खूप वेगळा आहे. Clavis Kia चं डिझाइन हे वेगळं असणार आहे. जे Carnival, EV9 आणि Syros पेक्षा नवीन Kia च्या कारमध्ये दिसत असतं. Clavis चा फ्रंट हा खूप वेगळा असणार आहे. ज्यामध्ये नवीन LED हेडलॅम्प सेटअप दिली आहे. जो तीन-पॉड अरेंजमेंट आणि ट्रायंगल आकारात आहे. हेडलाइट्स नवीन डिझाइनच्या फ्रंट ग्रिल आणि फ्रंट प्रोफाइलला नवीन रुप देतेय.
advertisement
किती बदलला लूक
जर नवीन Kia Clavis चा लूक पाहिला तर साइडने फार काही बदल दिसत नाही. फक्त नवीन अलॉय व्हील बदलले आहे. Kia Clavis मध्ये इंटिरिअर डिझाइनमध्ये बदल केला जाईल. तसंच पॅनोरमिक सनरूफ, दोन TFT स्क्रीन—एक इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर स्वरुपात टच-सेंसिटिव्ह क्लाइमेट कंट्रोल पॅनल, व्हेंटिलेटेड सीट आणि लेव्हल 2 ADAS दिले जातील अशी अपेक्षा आहे.
इलेक्ट्रिक Clavis येईल का?
नवीन Clavis पेट्रोल व्हर्जनसह इलेक्ट्रिक सुद्धा येईल अशी अपेक्षा आहे. कारण, सध्या सेम मॉडेल ठेवून थोडेफार बदल करून गाड्या लाँच केल्या जात आहे. नवीन Kia Clavis ची Carens च्या समान पावरट्रेन सेटअप तसाच ठेवण्याचा प्रयत्न करेल. या कारमध्ये 1.5-लिटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश असेल. यामध्ये 6-स्पीड म्यॅनुअल, 6-स्पीड क्लचलेस म्यॅनुअल, 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक आमि 7-स्पीड ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक असणार आहे. Clavis चा एक इलेक्ट्रिक व्हेरिएंट सुद्धा लाँच केलं जाईल. जे भारतात लाँच होण्याचीही चिन्ह आहे.