महिंद्राकडून नुकताच एक टिझर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता शाहरूख खानच्या डॉन सिनेमाच्या टायटल ट्रॅकवर हा टिझर रिलीज केला आहे. यामध्ये Mahindra XUV 7XO ची झलक पाहण्यास मिळतेय. यामध्ये L-शेप LED DRL, प्रोजेक्टर हेडलाईट्स आणि मागे L-शेप LED टेल लाइट्स दिले आहे. त्यामुळे नवीन Mahindra XUV 7XO ही वेगळी असणार आहे, हे स्पष्ट आहे.
advertisement
प्रीमियर फिचर्स
नव्या Mahindra XUV 7XO मध्ये फिचर्सची माहिती अद्याप समोर आला नीही. पण यामध्ये प्रीमियम इंटीरियर, पॅनोरमिक सनरूफ, ADAS सेफ्टी फिचर्स, हरमन ऑडिओ सिस्टम, ट्रिपल स्क्रीन सेटअप आणि 360-डिग्री कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर ABS, EBD, ६ एअयरबॅग आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट सारखे सेफ्टी फिचर्सही दिले जातील. हे फिचर्स महिंद्राच्या आधीच्या एसयूव्हीमध्येही पाहण्यास मिळाले.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये २ इंजिन
Mahindra XUV 7XO मध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरं 2.2-लिटर टर्बो डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. या दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळेल.
कधी होणार लाँच?
Mahindra XUV 7XO ने ही एसयूव्ही लाँच करण्याची तारीखही जाहीर केली आहे, ५ जानेवारी २०२६ मध्ये Mahindra XUV 7XO अधिकृतपणे लाँच होईल. त्या दिवशीच एसयूव्ही किंमतही सांगितली जाईल. लाँच झाल्यानंतर Mahindra XUV 7XO चा सामना हे थेट मिडसाईज एसयूव्ही MG Hector, Tata Sierra, Tata Safari, Hyundai Creta, Honda Elevate आणि Kia Seltos सारख्या एसयूव्हीशी असणार आहे.
