'ही नवीन योजना मानक वित्त योजनांपेक्षा सुमारे 20% कमी आहे. 5 वर्षे किंवा 75,000 किमी नंतर, ग्राहक त्यांची कार ही मारुती सुझुकीकडे परत करू शकतात आणि त्यांना वाहनाच्या मूळ किमतीच्या 50% हमी बायबॅक मूल्य मिळेल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, जुन्या कारचे मूल्य नवीन ग्रँड विटारासाठी डाउन पेमेंट म्हणून मानलं जाईल आणि कारचे वय, मायलेज आणि मालकाच्या माहितीच्या आधारे त्याचे मूल्यांकन केले जाईल, अशी माहिती
advertisement
मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि सेल्स) पार्थो बॅनर्जी यांनी दिली.
ई-विटारा वर देखील ऑफर
मारुती सुझुकी ही योजना सर्वात आधी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बंगळुरूमध्ये सुरू करेल. पायलट टप्प्यातील निकाल आणि अभिप्रायाच्या आधारे, कंपनी ही योजना आगामी ई-विटारासह इतर मॉडेल्समध्ये विस्तारित करण्याची योजना आखत आहे.
ग्रँड विटाराचे अपडेटेड व्हर्जन लाँच
मारुती सुझुकीने अलीकडेच ग्रँड विटाराचे अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे. ज्याची किंमत ११.४२ लाख रुपये ते २०.६८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. अपडेटेड ग्रँड विटारा १८ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. जे 8 ट्रिममध्ये सिग्मा, डेल्टा, डेल्टा+, झेटा, झेटा (ओ), झेटा+ (ओ), अल्फा (ओ) आणि अल्फा+ (ओ) या व्हेरिएंटमध्ये आहे. अपडेटेड ग्रँड विटारा आता सर्व प्रकारांमध्ये मानक म्हणून 6 एअरबॅग्जसह येते. मानक सुरक्षा फिचर्समध्ये हिल होल्ड असिस्टसह इलेक्ट्रॉनिक स्थिरता (ESP), फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, EBD सह ABS, ३-पॉइंट ELR सीट बेल्ट (सर्व सीट), ISOFIX चाइल्ड सीट रिस्ट्रेंट सिस्टम आणि बरेच काही फिचर्स दिले आहे.
3 पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध
ग्रँड विटारा तीन पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, स्ट्रॉंग हायब्रिड आणि सीएनजी. ६००० आरपीएमवर १०२ बीएचपी आणि ४४०० आरपीएमवर १३६.८ एनएम टॉर्क निर्माण करते. स्ट्रॉंग हायब्रिड आवृत्ती १.५-लिटर थ्री-सिलेंडर अॅटकिन्सन पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरद्वारे आहे. पेट्रोल इंजिन ५,५०० आरपीएमवर ९१ बीएचपी आणि ४,४०० ते ४,८०० आरपीएम दरम्यान १२२ एनएम टॉर्क निर्माण करते. इलेक्ट्रिक मोटर ३,९९५ आरपीएमवर अतिरिक्त ७९ बीएचपी आणि १४१ एनएम टॉर्क निर्माण करते. हे सेटअप ई-सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते.