मारुती सुझुकीने मागील काही दिवसांपासून Fronx ही मिड एसयुव्ही Hybrid व्हर्जनमध्ये तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत मारुती ही टोयोटाकडून हायब्रिड टेक्नोलॉजी वापरत होती. पण आता मारुती सुझुकीने स्वस्त:ची हायब्रिड टेक्नोलॉजी विकसित करण्याचं काम सुरू केलं आहे. Fronx चं नाहीतर नवीन बलेनो, आणि आगामी कॉम्पॅक्ट MPV आणि इतर मॉडेल्समध्येही हायब्रिड टेक्नोलॉजी देणार हे जवळपास निश्चित आहे.
advertisement
हायब्रिड टेक्नोलॉजी का?
हायब्रिड कार इ्ंधन आणि बॅटरी अशा दोन्ही घटकांवर धावते. हायब्रिड वाहनात पेट्रोल किंवा डिझेलसारख्या इंटर्नल कम्बशन इंजिनसह इलेक्ट्रिक बॅटरीचा देखील समावेश असतो. यामुळे वाहनाची रेंज आणि इंधन कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. जगभरात पेट्रोल किंवा डिझेल वाहनांव्यतिरिक्त स्ट्राँग हायब्रिड, माईल्ड हायब्रिड, प्लग इन हायब्रिड आणि प्युअर इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत आहे. हायब्रिड वाहनांना पसंती मिळण्यामागं काही कारणं आहेत. हायब्रिड कार चांगले मायलेज देतात. या कार लांबच्या प्रवासात 25 ते 30 किमी प्रतिलिटर मायलेज देतात. ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या मते, हायब्रिड कारची रनिंग कॉस्ट दीर्घकाळासाठी विचार करता ईव्हीपेक्षा कमी आहे. त्यामुळेच मारुतीने स्वत:ची हायब्रिड टेक्नोलॉजी तयार करत आहे. मारुती ही स्ट्राँग हायब्रिड प्रणालीचा वापर करणार आहे. त्यामुळे कार ही सहज ३० किमीपेक्षा जास्त मायलेज देईल.
Fronx Hybrid कशी असेल?
fronx hybrid फ्रँक्स हायब्रिड ही या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही नवीन हायब्रिड पॉवरट्रेन १.२-लिटर Z12E पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर वापरेल. मारुती अशी मोटर विकसित करत असल्याने ही हायब्रिड पॉवरट्रेन अधिक विश्वासार्ह आणि देखभालीसाठी सोपी असेल. मारुतीची खासियत नेहमीच अशी राहिली आहे. नवीन हायब्रिड पॉवरट्रेनसह, मारुती सुमारे ३५ ते ४० किमी प्रति लिटर मायलेज गाठू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
फ्राँक्स हायब्रिडमध्ये नवीन झेड 12 ई पेट्रोल इंजिन असेल. सध्या हे इंजिन स्विफ्ट आणि डिझायरमध्ये वापरलं जात आहे. मारुती सुझुकी कंपनीने स्वतः विकसित केलेली स्ट्राँग हायब्रिड सिस्टीम या कारमध्ये समाविष्ट असेल. ही कार 35 kmplपेक्षा जास्त मायलेज देईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हायब्रिड पॉवरट्रेनव्यतिरिक्त अपडेटेड फ्राँक्सच्या डिझाइनमध्ये थोडा बदल असेल. तिचं इंटीरिअर अपग्रेड केलेलं असू शकते. या कारमध्ये सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडीसह 6 एअरबॅग्ज आणि एडीएएस लेव्हल 2 मिळू शकते. सध्या या कारची प्रारंभिक किंमत (एक्स शोरूम) 7.51 लाख रुपये आहे.