केंद्र सरकार लवकरच ट्रक आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची सेफ्टी चाचणी करणार आहे. ज्या प्रकारे कारची “Bharat NCAP” च्या नावाने सुरक्षा चाचणी होती. त्याच प्रकारे आता ट्रकसह इतर वाहनांची होणार आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी वाहनं किती सुरक्षित आहे, याची माहिती समोर येईल. ही योजना लवकरच सुरू केली जाईल. वाहन उत्पादक कंपन्यांनी चांगल्या दर्जाची वाहनं आणि सुरक्षेची खात्री करून वाहनं ग्राहकांना द्यावी या हेतूने हे सुरू केलं जात आहे. नवीन कार सुरक्षा प्रणाली (GNCAP) आणि रस्ते सुरक्षा शिक्षा संस्थान (IRTE) ने मिळून हे आयोजित केलं आहे. या नवीन योजनेमुळे ट्रक आणि इतर मालवाहतूक वाहनांची सुरक्षा आणखी मजबूत होईल. भविष्यात रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण यामुळे कमी होईल, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.
advertisement
ई-रिक्षाचीही होणार सेफ्टी चाचणी
सरकार आता बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षासाठी खास सुरक्षा नियम आणि प्रणाली आणणार आहे. देशभरात ज्या ई-रिक्षा धावत आहे, त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी आहे. रिक्षाची सुरक्षा आणि दर्जा चांगला असेल तर अनेक लोकांना रोजगार मिळेल. सोबतच शहरी आणि ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही अधिक सुरक्षित होईल, असंही गडकरींनी स्पष्ट केलं.
भारतात दरवर्षी 4.8 लाख अपघाती मृत्यू
भारतात 2023 मध्ये सरकारने “Bharat NCAP” ची सुरुवात केली. याचा उद्देश हाच आहे की वाहनांची सुरक्षा चांगली पाहिजे. खास करून 3.5 टन वजनांच्या वाहनांसाठी हे आहे. भारतात दरवर्षी जवळपास 4.8 लाख रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये जवळपास 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सरकारचं पहिलं काम आहे की, रस्ते सुरक्षा वाढवली पाहिजे. हायवे निर्माण केले पाहिजे. याशिवाय वाहनांची सेफ्टीही तितकी महत्त्वाची असून ईलेक्ट्रिक वाहनांचाही या योजनेत समावेश केला जाईल, असंही गडकरी म्हणाले.
ट्रक चालकही शिफ्टनुसार!
आमचं लक्ष्य आहे की, भविष्यात मालवाहतुकीचं प्रमाण हे14-16% वरून 9% आणावं. आमचा प्रयत्न आहे की, ट्रकचालकांच्या काम करणाऱ्याचे वेळ कमी केले पाहिजे. सध्या ट्रक ड्रायव्हर दिवसाला 13-14 तास ट्रक चालवतात त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होतो आणि अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थिती सरकार यासाठी कायदा करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे ट्रकचालकांना शिफ्टनुसार काम करता येईल, असंही गडकरींनी स्पष्ट केलं.