मागील काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मेकिंग विथ मिहीर नावाच्या युट्यूब चॅनेलवर या तरुणाने जुनी हुंदई सँट्रो ईव्ही कार केली आहे. इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी फक्त त्याला ३ दिवस लागले. त्यानंतर आता सेंट्रो कार ही पूर्णपणे ईलेक्ट्रिक कारसारखी वापरत आहे.
किती आला खर्च?
या तरुणाने सर्वात आधी सँट्रोचं इंजिन वेगळं केलं. त्याच्या जागी एक इलेक्ट्रिक मोटर बसवली. तसंच आधीची असलेली मोटर तशीच ठेवली त्यामुळे पॉवर स्टेअरिंग आणि एसी कम्प्रेसर कंट्रोल करता येईल. त्यानंतर बूट स्पेसमध्ये LFP बॅटरी लावली आणि इथून तिला इलेक्ट्रिक मोटरशी कनेक्ट केलं. पॉवर ब्रेकची समस्येसाठी त्याने इलेक्ट्रिक वॅकम पंप लावला. या कारमध्ये त्याने 12 वॉल्टची बॅटरी लावली. ज्यामुळे पॉवर विंडो, सेंट्रल लॉक आणि हेडलाइट ऑपरेट करता येईल.
advertisement
फुल चार्ज केल्यावर 80 किमी रेंज
मिहिरने आपली पेट्रोल कार हुंदई सँट्रो इलेक्ट्रिक कन्व्हर्ट करण्यासाठी २.५५ लाख रुपये खर्च केले. आता ही सँट्रो एकदा फुल चार्ज केल्यावर ८० किमी इतकी रेंज देतेय. या कारचा टॉप स्पीड हा ६० किमी इतका आहे. मिहिरने हा प्रयोग मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या कीटच्या आधारे केला. पण, हा प्रयोग कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतो. त्यामुळेच, मार्केटमध्ये ईव्ही कार उत्पादक कंपनीची EV कार खरेदी करावी.