Renault मोटर्सने आपल्या नवीन SUV चं नाव जाहीर केलं आहे. नवी एसयुव्ही ही Boreal नावाने लाँच होणार आहे. कंपनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा एसयूव्हीचं टिझर प्रसिद्ध केलं आहे. या एसयूव्हीबद्दल अजून कोणताही माहिती कंपनीने दिली नाही. पण Renault ची डस्टर आपल्या सेगमेंटमध्ये एकेकाळी सर्वाधिक विक्री झाली एसयूव्ही होती.
Renault Boreal कशी असेल?
Renault ने SUV चं नाव तर सांगितलं आहे. Boreal नावाने ही नवीन एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच करणार आहे. ही एसयूव्ही लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीने जारी केलेल्या टिझरमध्ये फक्त या नव्या Renault Boreal चं फक्त नाव दिसत आहे. विशेष म्हणजे, ही Boreal 7 सीटर असणार आहे. याआधी डस्टर ही 5 सीटर होती. अशी माहिती मिळतेय की Renault Boreal ही 5 सीटरचा ऑप्शन सुद्धा दिला जाईल. पण याबद्दल अजून कंपनीने काही माहिती दिली नाही.
भारतात कधी होईल लाँच?
Renault Boreal भारतात कधी लाँच होणार याबद्दल कंपनीने कमालीचा सस्पेन्स राखला आहे. पण Renault Boreal ही भारतात २०२६-२७ मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.