TRENDING:

Royal Enfield च्या धाकड बाइकसोबत झाला 'स्कॅम', कंपनीने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

दणकट आणि दमदार अशा बाइक तयार करणारी रॉयल एनफिल्ड कंपनीला त्यांचा निर्णय महागात पडला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दणकट आणि दमदार अशा बाइक तयार करणारी रॉयल एनफिल्ड कंपनीला त्यांचा निर्णय महागात पडला आहे. मागील काही महिन्यांमध्ये रॉयल एनफिल्डने एकापेक्षा एक अशा दमदार गाड्या लाँच केल्या होत्या. त्यात नोव्हेंबरमध्ये एक 400 सीसी बाइकचं व्हर्जन सुद्धा होतं. या बाइकच्या इंजिनमध्ये जबरदस्त पॉवर होती. टॉर्कही चांगला होता. पण कंपनीला या बाइकचं प्रोडक्शन अचानक बंद करावं लागलं. आता तर कंपनीला या बाइकचं बुकिंग आणि प्रोडक्शन सुद्धा बंद करावं लागलं आहे. या बाइकसोबत मोठं कांड झालं होतं.
News18
News18
advertisement

ही बाइक आहे Royal Enfield Scram 440, जी कंपनीने आपल्या जुन्या Scram 411 चं अपडेड्स मॉडेल होतं.  ऑटोकार इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने या बाइकचं प्रोडक्शन बंद केलं. एवढंच नाहीतर कंपनीने या बाइकची विक्री सुद्धा थांबवली.

कंपनीने का बंद केली बाइक? 

advertisement

Royal Enfield Scram 440 ची विक्री जानेवारी महिन्यात सुरू झाली होती. पण फक्त ४ महिन्यामध्ये कंपनीला ही बाइक बंद करावी लागली. एप्रिल महिन्यात कंपनीने या बाइकची बुकिंग थांबवली. कंपनीने  Scram 440 चं उत्पादन सुद्धा थांबवलं. कंपनीने  Scram 440 बंद करण्याचं मोठं कारण समोर आलं. या बाइकमध्ये मोठा तांत्रिक बिघाड समोर आला होता. रॉयल एनफिल्ड  Scram 440 च्या आयसोलाइटेड यूनिट्समध्ये एक अंतर्गत बिघाड होता. त्यामुळे बाइक काही अंतर चालल्यानंतर इंजिन पुन्हा स्टार्ट होतं नव्हतं. अनेक वेळा असं पाहिलं जातं की बाइकचं इंजिन बंद केल्यानंतर लगेच सुरू होतं. पण री-स्टार्ट होत नाही.

advertisement

ग्राहकांना मिळणार फ्री सर्विस

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

रॉयल एनफिल्डने या बाइकमधला बिघाड सुधारण्याचं काम हाती घेतलं आहे. लवकरच या बाईकचे पार्ट हे डिलर्सपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांकडे  Scram 440 आहे त्यांना मोफत सर्व्हिस दिली जाणार आहे. पण कंपनी या बाइकची नवीन ऑर्डर घेत नाही. या बाइकमध्ये आता 443cc चं एअर कुल्ड इंजिन दिलं जाणार आहे.  25.4 bhp ची पॉवर आणि 34 Nm चा टॉर्क जनरेट केला जातो.  या बाइकची किंमत 2.08 लाख रुपये इतकी आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Royal Enfield च्या धाकड बाइकसोबत झाला 'स्कॅम', कंपनीने घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल