अलीकडे, टाटा मोटर्सने पुण्यात या कारची रस्त्यावर चाचणी सुद्धा सुरू केली आहे. या एसयूव्ही काही फोटो समोर आले आहे. या फोटोवरून ही कार नेमकी कशी असेल याचा फक्त अंदाज बांधू शकतो. असं सांगितलं जातंय की ही कार टाटाची सगळ्यात मजबूत कार पंचचं फेसलिफ्ट मॉडेल असण्याची शक्यता आहे. टाटा पंचचं हे फेसलिफ्ट मॉडेल ईव्ही असण्याची चिन्ह आहे. जे २०२६ च्या आधी लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
डिजिटल डिझाइन आणि नव्याने मांडणी
टाटा पंच फेसलिफ्ट ही नव्याने डिजिटल डिझाइन केलेली आहे. जी गेल्या वर्षी नेक्सॉन ईव्हीसह डेब्यू झाली होती. इलेक्ट्रिक वाहन म्हणून, नवीन पंचमध्ये क्लूज फ्रंट ग्रिल आणि बोनेटच्या अगदी खाली असलेली एक आकर्षक, कनेक्टेड एलईडी डीआरएल स्ट्रिप आहे. हा DRL बँड इंडेकेडर म्हणून काम करेल.
सिग्नेचर स्प्लिट हेडलॅम्प्स
मायक्रो एसयूव्हीने तिचा सिग्नेचर स्प्लिट हेडलॅम्प सेटअप कायम ठेवला आहे. पण तो उभ्या स्टॅक केलेल्या एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी फॉग लॅम्पसह अपडेट केला आहे, ज्यामध्ये आता कॉर्नरिंग फंक्शन समाविष्ट आहे. अपडेटेड पंचमध्ये नवीन १६-इंच अलॉय व्हील्स आहेत. मागील बाजूस, डिझाइन मोठ्या प्रमाणात सारखेच आहे, फक्त LED टेललाइट्सच्या आतील घटकांमध्ये थोडेफार अपडेट्स आहेत.
केबिन कशी असेल?
टेस्ट दरम्यान दिसलेल्या पंच फेसलिफ्टच्या केबिनची झलक पाहण्यास मिळाली. डॅशबोर्ड डिझाइन टाटा मोटर्सच्या नवीन गाड्यांशी सुसंगत आहे ज्यात अलीकडेच लाँच झालेल्या अल्ट्रोझ फेसलिफ्टचा समावेश आहे. यामध्ये मध्यभागी असलेली मोठी १०.२५-इंच फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे हरमन इन्फोटेनमेंट सिस्टीम खूप हायटेक आहे आणि यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह आयआरए कनेक्टेड कार सूट आणि अनेक व्हॉइस कमांडचा समावेश आहे.
फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील
टाटाचे नवीन फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये मध्यभागी एक लोगो आणि विविध नियंत्रणांसाठी बाजूंना टॉगल बटन आहेत. फोटोवरून ही कार ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह आहे. डॅशबोर्ड, पंच फेसलिफ्टमध्ये एक नवीन क्लायमेट कंट्रोल पॅनल आणि ४५W टाइप-सी, यूएसबी आणि १२V सॉकेट सारखे चार्जिंग फिचर्स दिले आहेत. २०२५ टाटा पंच फेसलिफ्टमध्ये कोणतेही बदल होण्याची अपेक्षा नाही. कदाचित त्यात १.२-लिटर, ३-सिलेंडर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह जे ८६ बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क निर्माण करते. आय-सीएनजी बाय-फ्युएल व्हेरिएंट देखील राहील, जे ७३.४ बीएचपी आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करतो. पेट्रोल आवृत्तीसाठी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा समावेश असेल.