टाटा मोटर्सने Harrier EV कडून एलिफेंट रॉक चॅलेंज पूर्ण करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. केरळमधील एलिफेंट रॉक हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. केरळमधील एलिफेंट रॉक (Elephant Rock) हे एक नैसर्गिक खडकाचे ठिकाण आहे जे हत्तीच्या आकारासारखे दिसते, म्हणूनच त्याला हे नाव पडलं आहे. केरळमधील विविध ठिकाणी असे काही खडक आहेत ज्यांना स्थानिक लोक आणि पर्यटक "एलिफेंट रॉक" म्हणतात. हा पूर्णपणे एक खडकाळ डोंगर आहे. 3937 फूट उंच याची उंची आहे.
advertisement
टाटा मोटर्सकडून डॉ. मोहम्मद फहाद सारख्या प्रो ऑफ-रायडरने Harrier EV ही या खडकाळ डोंगरावर चालवण्यासाठी दिली. या खडकाळ डोंगरावर एक जरी चूक झाली असती तर Harrier EV ही हजारो फूट खाली कोसळली असती. पण फहाद यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून ही कार शिखरापर्यंत यशस्वीरित्या नेली.
मुळात Harrier EV ने 3 स्टेजमध्ये हे चॅलेंज पूर्ण केलं. पहिल्या दोन स्टेजमध्ये द माइनफील्ड, सेकेंड स्टेज द रिज आणि फायनल स्टेज द बीस्ट होता. या चॅलेंज बिल्कुल सोप्पं नव्हतं. मुळात अशा ठिकाणी जर एखादी पेट्रोल आणि डिझेल कार चालवली असती तर इंजिन आणि गाडीने किती साथ दिली असती हे कळलं नसतं. मुळात अशावेळी पेट्रोल आणि डिझेल कारची कल्च प्लेट ही खराब होण्याची पूर्ण शक्यता होती. पण त्या ठिकाणी ईव्ही गाडी ही किती मजबूत आहे, हे Harrier EV ने सिद्ध करून दाखवलं आहे.
Harrier EV चे खास फिचर्स
Harrier EV ने हे रॉक चॅलेंज पूर्ण केलं, यासाठी गाडीत असलेले खास फिचर्स कामी आले आहे. Harrier EV मध्ये ट्रांसपॅरेंट मोड, ऑफ-रोड असिस्ट, रॉक क्रॉल मोड, बूस्ट मोड आणि ऑल व्हील ड्रायव्ह सारखे फिचर्स आहे. हे फिचर्स कोणत्याही खडतर मार्गावर सहज प्रवास करण्यासाठी आणखी मदत करून देतात. सेफ्टी आणि कम्फर्टसारख्या फिचर्ससह इंटरटेन्मेंटसारखे फिचर्स जोडले गेले आहे.