भारतातही लँड क्रूझरचे अनेक चाहते आहेत, पण ही कार इतकी महाग आहे की, सामान्य माणूस ती खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाही. भारतात त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे, तर दुबईमध्ये तुम्ही तीच कार फक्त ३० लाख रुपयांना खरेदी करू शकता. मग किंमतीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त फरक का आहे? त्याचप्रमाणे, अमेरिकेत फक्त ५५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या BMW X5 ची किंमत भारतात येताच १ कोटी रुपयांच्या पुढे जाते.
advertisement
परदेशाात गाड्या इतक्या स्वस्त का?
भारतात २ कोटींना मिळणारी रेंज रोव्हर अमेरिकेत फक्त ८० लाख रुपयांना मिळते, तर ५० लाखांची फॉर्च्युनर कार दुबईत फक्त ३५ लाख रुपयांना मिळते. BMW X5 दुबईमध्ये ७५ लाख रुपयांना उपलब्ध असेल, जी भारतात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली जाते. किमतींमधील हा फरक केवळ भारत सरकार या उत्पादनांवर लावत असलेल्या करामुळे आहे, असं गुंतवणूक बँकर सार्थक आहुजा यांनी सांगितलं.
भारत किती आकारला जातो कर?
भारतात या गाड्यांच्या किंमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण कर आहे. सरकार लक्झरी गाड्यांवर ६० ते १०० टक्के आयात शुल्क आकारते. याशिवाय २८ टक्के जीएसटी देखील आकारला जातो. एवढंच नाही तर या जीएसटी रक्कमेवर सेस देखील आकारला जातो. त्याशिवाय सरकार कार खरेदीदाराकडून रोड टॅक्स देखील वसूल करतो. अशाप्रकारे, आयात शुल्काव्यतिरिक्त, कारच्या प्रत्यक्ष किंमतीच्या सुमारे ४५ टक्के रक्कम कर म्हणून वसूल केली जाते.
...म्हणून दुबईत कार स्वस्त
या गाड्यांच्या किमतींमध्ये फरक इतका जास्त आहे कारण दुबईसारख्या देशांमध्ये आयात शुल्क खूप कमी आहे आणि त्यावरील कर देखील खूप कमी आहे. टाटा आणि मारुती सारख्या कंपन्यांच्या गाड्या भारतात खूपच स्वस्त आहेत कारण त्या इथंच तयार केल्या जातात आणि आयात शुल्कासारख्या घटकांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. जेव्हा याच गाड्या इतर देशांमध्ये जातात तेव्हा त्यांच्या किमती तिथे वाढलेली असते.