TRENDING:

Toyota ची फॉर्च्युनर आता सगळ्यांच्या दारात दिसेल, आणतेय धाकड Mini Fortuner

Last Updated:

आता टोयोटा मिनी फॉर्च्युनरवर काम करत असल्याचं समोर आलं आहे. 2023 मध्ये टोयोटाने नवीन लँड क्रुझर 250 ची झलक दाखवली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात फॉर्च्युनर म्हणजे बाहुबली नेता असल्याची शान. त्यामुळे भारतात ज्या नेत्याकडे फॉर्च्युनर तो तितका उंचीचा समजला जातो. अशातच आता टोयोटा मिनी फॉर्च्युनरवर काम करत असल्याचं समोर आलं आहे. 2023 मध्ये टोयोटाने नवीन लँड क्रुझर 250 ची झलक दाखवली होती. तेव्हा कंपनीने LC250 या छोट्या SUV ची झलक दाखवली होती. तेव्हापासून, टोयोटा अधिक परवडणाऱ्या ऑफ-रोडिंग एसयूव्ही लाँच करणार अशी शक्यता होती. आता अखेरीस टोयोटाकडून एका मिनी एसयूव्हीचं पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, त्या एसयुव्हीचा फोटो ऑनलाइन लीक झाला आहेत.
News18
News18
advertisement

असं म्हटलं जातंय ही एका एसयूव्हीचं नाव FJ क्रुझर असणार आहे. टोयोटाने जानेवारी २०२४ मध्ये या एसयूव्हीसाठी पेटंट दाखल केलं होतं, परंतु ते आता समोर आलं आहे. हा फोटो फिलीपिन्समधील पेटंट ऑफिसमधून लीक झाल्याचं वृत्त आहे आणि गेल्या वर्षी लीक झालेल्या एफजे क्रूझरच्या डिजिटली रेंडर केलेल्या फोटोशी अगदी सेम आहे.

advertisement

ही FJ cruiser एसयुव्ही भारतीय बाजारपेठेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण, टोयोटा फॉर्च्युनरची अधिक परवडणारी आणि थोडीशी लहान अशी मीनी एसयूव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. एफजे क्रूझर ही आगामी मिनी फॉर्च्युनर असू शकते. "FJ" हे नाव टोयोटासाठी दीर्घकाळापासून प्रतिष्ठित राहिलं आहे, लँड क्रूझरच्या अनेक जनरेशनपासून FJ हे नाव देण्यात आलं आहे, ज्याची सुरुवात १९५५ मध्ये FJ20 पासून झाली.

advertisement

FJ क्रूझरवरून तयार होतेय SUV

FJ नावाचा सर्वात अलीकडील वापर २००६ ते २०२२ पर्यंत तयार केलेल्या रेट्रो-प्रेरित FJ क्रूझरवर होता. आगामी FJ क्रूझर IMV लॅडर-ऑन-फ्रेम चेसिसच्या तयार केली जाणार आहे. सध्या थायलंड आणि इंडोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या टोयोटा हिलक्स चॅम्प पिकअप ट्रकला आधार देतो. हे प्लॅटफॉर्म विद्यमान IMV आर्किटेक्चरचे व्युत्पन्न आहे, जे भारतात इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर आणि हिलक्सला आधार देते.

advertisement

कॉम्पॅक्ट क्रूझर EV कॉन्सेप्ट

टोयोटाची नवीन SUV ही २०२१ मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट क्रूझर EV कॉन्सेप्टची मोठी, अधिक विकसित मॉडेल आहे. त्याच्या बॉक्सी लूकमुळे पाच-दरवाज्यांच्या कॉन्फिगरेशनची पुष्टी करते. मजबूत SUV मध्ये प्रमुख फ्रंट आणि रीअर फेंडर्स, जाड सी-पिलर आणि उभ्या मागील डिझाइन आहेत.

advertisement

इंजिन आणि पॉवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

टोयोटा आगामी FJ क्रूझरसह अनेक इंजिन पर्याय देईल, ज्यामध्ये Hilux Champ मधील 2.0-लिटर पेट्रोल इंजिन, 2.7-लिटर पेट्रोल युनिट आणि सध्या फॉर्च्युनरमध्ये वापरले जाणारे 2.8-लिटर डिझेल इंजिन यांचा समावेश आहे. टोयोटा गेल्या काही काळापासून फॉर्च्युनरचं परवडणारं मॉडेल लाँच करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे याबद्दल उत्सुक्ता लागून आहे आता  ही FJ क्रूझर त्यासाठी पूर्णपणे योग्य ठरणार आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ची फॉर्च्युनर आता सगळ्यांच्या दारात दिसेल, आणतेय धाकड Mini Fortuner
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल