Maruti Suzuki Wagon VXI AMT
Maruti True Value हे मारुती सुझुकी कंपनीकडून अधिकृत सेकंड हँड शोरुम आहे. या ठिकाणी अनेक वापरात असलेल्या कार विक्रीसाठी उपलब्ध असतात. या साईटवर तुम्हाला 2016 ची मारुती सुझुकी वॅगन-आर VXI AMT उपलब्ध आहे. या कारची डिमांड किंमतही 2.80 लाख रुपये आहे. ही कार तुम्हाला EMI वर सुद्धा विकत घेता येईल.
advertisement
याच साईटवर Baleno Delta MT चं व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.73 लाख रुपये आहे. Used वॅगन-आर कार ही 1,06, 485किलोमीटर चालली आहे. ही कार सध्या दिल्लीत उपलब्ध आहे. सिल्व्हर रंग या कारचा आहे. या कारचा 1st Owner आहे.
2019 Maruti Suzuki Wagon R VXI
जर तुम्ही पुण्यात राहणारे असाल तर तुम्हाला Maruti True Value वर आणखी स्वस्तात Wagon R VXI मिळेल. 2012 ची मारुती सुझुकी वॅगन-आर VXI उपलब्ध आहे. ही कार फक्त 2.50 लाख रुपयांमध्ये कार विकत घेता येईल. यासाठी तुम्ही EMI सुद्धा करू शकतात. वॅगन-आरचं हे नवी मॉडेल आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 5.78 लाखांपर्यंत मिळेल. Used वॅगन-आर कार एकूण 62,224 किलोमीटर चालली आहे. ही कार पुण्यात उपलब्ध आहे. कारचा ओनर हा पहिला आहे. RTO ऑफिस हे पुण्यातलं येईल.
सेकंड हँड कार खरेदी करताना अशी घ्या काळजी
जर तुम्ही कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे, नाहीतर ही सेकंड हँड कार डोकेदुखीचं कारही ठरू शकतं. सर्वात आधी सेकंड हँड कार ही चालू करून पाहा. जर कारचं टेम्प्रेचर हे कमी असेल तरच खरेदी करा. तसंच कारचं इंजिन एकदा चेक करा. कुठे आईल लिकेज, आवाज जास्त तर करत नाही ना हे तपासून पाहा. जर तुम्हाला याबद्दल अंदाजा येत नसेल तर एखादा ओळखीतला मॅकॅनिक सोबत घेऊन जा. त्याच्याकडून कारचं पाहणी करून घ्या मगच सल्ला घेऊन कार खरेदी करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कारचे कागदपत्र नीट तपासून पाहा. कारचं आरसी, रजिस्ट्रेशन आणि विमा पेपर्स ठीक आहे ना हे आधी तपासून पाहणे गरजेचं आहे. त्याचबरोबर कारचं स्टेअरिंग व्हिल सुद्धा नीट तपासणी करा. कारच्या सायलन्सरमधून काळा धूर तर येत नाही ना हे आवर्जून पाहा, मगच कार खरेदी करा.