फोक्सवॅगनची Taigun SUV तिच्या सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट अशी एसयूव्ही ठरली आहे. Taigun SUV ची किंमत ७९,००० रुपयांनी कमी केली आहे. व्हर्टस सेडान प्रमाणेच, ब्रँडने या एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत ७९,००० रुपयांनी कमी केली आहे. किमतीत कपात करण्याव्यतिरिक्त, VW Taigun SUV वर २.५ लाख रुपयांपर्यंतचे फायदेही दिले आहे.. Taigun SUV GT प्लस क्रोम मॉडेलवर जास्तीत जास्त सूट दिली आहे.
advertisement
२ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट
Volkswagen च्या इतर एसयूव्ही मॉडेल्सवर १.४ लाख ते २ लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे. या ऑफरमुळे SUV तुम्हाला अधिक बचत करण्यास मदत करेल. या एसयूव्हीवरील नेमकी किती सूट दिली आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही Volkswagen च्या जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी, जेणे करून नेमकी ऑफर काय आहे याची अचून माहिती मिळेल. Taigun SUV ही Hyundai Creta, Maruti Grand Vitara, Kia Seltos, Skoda Kushaq आणि Toyota Hyryder सारख्या इतर एसयूव्हीला टक्कर देते.
Volkswagen Virtus किंमत आता किती?
Volkswagen ने ऑफर दिल्यामुळे Virtus ची किंमत आणखी कमी झाली आहे. आता या कारची किंमत १२.२५ लाख रुपयांपासून सुरू होते (ऑन-रोड, मुंबई). सवलतींबद्दल बोलायचे झाले तर, या सेडानवर जास्तीत जास्त १.३ लाख रुपयांची सूट दिली आहे. DSG ट्रान्समिशनसह १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या मॉडेलवर तुम्हाला जास्तीत जास्त सूट मिळू शकते. तसंच १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या सेडानवर, तुम्ही जास्तीत जास्त १ लाख रुपयांची सूट मिळवू शकता. ज्यामध्ये रोख बोनस आणि लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, १.० टीएसआय इंजिन आणि एटी गिअरबॉक्स असलेल्या Virtus Highline आणि Topline व्हेरिएंटवर १.९० लाख रुपयांचे फायदे मिळतात. Virtus सेडानच्या Sport आणि Chrome व्हेरिएंटवर अनुक्रमे १.३५ लाख आणि १.९० लाख रुपयांची सूट मिळते. शहरे आणि डीलरशिपनुसार या सवलती बदलू शकतात.