गुजरातमधील ही कंपनी जॉय या ब्रँड नावाने इलेक्ट्रिक स्कूटर विकते. कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरात त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
किंमत का कमी करायची?
बाजारात आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत ही कपात केली आहे.
advertisement
लेकीला स्कुटी गिफ्ट करायचीये? पण बजेट फक्त 1 लाख, मग हे आहेत बेस्ट ऑप्शन
Wardwizardने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्हाला ईव्ही स्वीकारण्याची गती वाढवायची आहे आणि या किमतीत कपातीमुळे ग्राहकांना परवडणारे पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे ईव्ही उद्योग आणखी मजबूत होईल."
Carमध्ये सतत AC चालू ठेवल्याने किती मायलेज कमी होते? जाणून घ्यायलाच हवं
वॉर्ड विझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड (पूर्वी मानवविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) ची स्थापना 20 ऑक्टोबर 1982 रोजी झाली.