यासाठी वाहनमालकांना पूर्वी मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, राज्यभरातील लाखो वाहनांमध्ये कमी कालावधीत HSRP नंबर प्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे ही मुदत आधीच 30 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु, आता महाराष्ट्र परिवहन विभागाने वाहनमालकांना आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे गाड्यांच्या मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढवलेल्या मुदतीनुसार आता गाडीमालकांकडे 30 जूनपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत सगळ्या गाड्यांचे HSRP नंबर प्लेट बदलले जातील अशी अपेक्षा केली जात आहे.
advertisement
पण नक्की ही प्लेट का लावावी? आणि याचे फायदे काय आहेत? (What will be the benefit of installing HSRP number) असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला हे महत्वाचं का आहे जाणून घेऊ.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?
HSRP ही हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे, जी सामान्य नंबर प्लेटपेक्षा अधिक सुरक्षित आणि अत्याधुनिक आहे. ही प्लेट अॅल्युमिनियमपासून बनवलेली असते आणि त्यावर क्रोमियम बेस हॉट स्टॅम्पिंग, युनिक कोड आणि टॅम्पर-प्रूफ लॉक असतात. यामुळे नंबर प्लेट बदलण्याचा किंवा गाडी चोरी झाल्यास तिचा गैरवापर होण्याचा धोका कमी होतो.
HSRP नंबर प्लेटचे फायदे
1. गाडी चोरीला जाऊ नये म्हणून मदत
HSRP प्लेटमध्ये युनिक कोड आणि RFID चिप असते, त्यामुळे चोरी झाल्यास गाडी शोधणं सोपं होतं. चोरी झालेली गाडी सहजपणे ट्रॅक करता येते.
2. बनावट नंबर प्लेटला आळा
पूर्वी कोणत्याही दुकानात जाऊन कोणत्याही नंबर प्लेट बनवता यायच्या, त्यामुळे बनावट नंबर प्लेटचा वापर वाढला होता. HSRP मुळे आता बनावट नंबर प्लेट बनवणं कठीण होईल.
3. वाहतूक नियमांचं पालन
सरकारने HSRP नंबर प्लेट बंधनकारक केल्यामुळे, जर ही प्लेट लावली नाही तर दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.
4. गाडीचा डेटा सुरक्षित
HSRP नंबर प्लेटमुळे वाहतूक पोलीस आणि RTO यांच्याकडे तुमच्या गाडीचा डिजिटल डेटा असतो. त्यामुळे जर अपघात किंवा इतर काही घटना घडली, तर गाडीचा तपशील लगेच मिळतो.
5. दीर्घकाळ टिकणारी आणि सुरक्षित प्लेट
ही प्लेट सामान्य नंबर प्लेटपेक्षा अधिक मजबूत असते. हवामान बदल, पाऊस किंवा ऊन यामुळे ती खराब होत नाही.
HSRP नंबर प्लेट घेण्यासाठी काय करावं लागेल? (how to get HSRP number plate)
जर तुमच्या गाडीवर HSRP नंबर प्लेट नसेल, तर ती मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया करा:
ऑनलाइन बुकिंग करा: अधिकृत RTO वेबसाइट किंवा गाडीच्या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करा.
किंमत भरा: प्लेटच्या किमती गाडीच्या प्रकारानुसार बदलतात, साधारणतः ₹400 ते ₹1,500 च्या दरम्यान त्याची किंमत आहे.
तुम्हाला दिलेल्या तारखेला आणि वेळेत RTO किंवा डिलरकडे पोहोचा आणि तिथे तुमच्या नोंदणीकृत वाहनासाठी ठरलेल्या दिवशी नवीन HSRP प्लेट गाडीवर बसवून घ्या.
तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट आहे का?
जर तुमच्या गाडीला ही प्लेट नसेल, तर लवकरात लवकर ती बसवून घ्या. कारण सरकार वेगवेगळ्या शहरांमध्ये HSRP नंबर प्लेट नसेल तर दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू करत आहे.
HSRP नंबर प्लेट ही केवळ नियम पाळण्यासाठी नाही, तर तुमच्या गाडीची सुरक्षा आणि ट्रॅकिंगसाठी एक महत्त्वाची सुविधा आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे अद्याप ही प्लेट नसेल, तर लगेचच ती बसवा आणि सुरक्षित प्रवास करा.