केरळमधील सर्वात महागड्या नंबर प्लेटचे मालक वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या नव्याने खरेदी केलेल्या लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मंटेसाठी व्हीआयपी नंबर प्लेट “KL 07 DG 0007” खरेदी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या नंबर प्लेटची किंमत ४५.९९ लाख रुपये आहे. यामुळे राज्यात कार नोंदणी क्रमांकावर सर्वाधिक खर्च होण्याचा एक नवीन रेकॉर्ड झाला आहे.
advertisement
७ एप्रिल रोजी, केरळ मोटार वाहन विभागाने एक ऑनलाइन लिलाव आयोजित केला होता ज्यामध्ये कोची येथील आयटी कंपनी लिटमस७ सिस्टम्स कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ गोपालकृष्णन यांनी बहुप्रतिक्षित ००७ नंबर प्लेट जिंकली. या क्रमांकाची बोली २५,००० रुपयांपासून सुरू झाली आणि वेगाने विक्रमी किंमतीपर्यंत पोहोचली.
गोपालकृष्णनने सुमारे ४ कोटी रुपये किमतीची हिरव्या रंगाची लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मंट सुपर कार खरेदी केली. वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या नवीन खरेदीचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी ते त्यांच्या संग्रहात जोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गोपालकृष्णन यांना महागड्या गाड्याची आवड आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये लॅम्बोर्गिनी हुराकन स्टेराटो आणि बीएमडब्ल्यू एम१००० एक्सआर बाईकचा समावेश आहे.