भल्याभल्यांना सुटत नाही, त्या एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं कोडं त्याने पहिल्याच प्रयत्नात सोडवलं. त्याची राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली. परंतु इथवर स्थिर न होता त्याने पुन्हा मेहनत घेऊन परीक्षा दिली आणि त्याची बीडीओ पदी निवड झाली. तरीही आपल्या अभ्यासात त्याने सातत्य ठेवलं. यंदा लागलेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात त्याला घवघवीत यश मिळालं. आता त्याची डीवायएसपी पदी नियुक्ती झाली आहे. अर्थातच अक्षयचा इथवरचा प्रवास काही सोपा नसेल.
advertisement
हेही वाचा : IPL 2024: मराठमोळ्या 'ऋतुराज'कडे CSK ची धुरा, पुणेकर चाहत्यांच्या प्रतिक्रिया, Video
2016 साली बीए मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून अक्षयने एमपीएससीचा अभ्यास करायला सुरूवात केली. 2017 साली त्याची कर निरीक्षक म्हणून निवड झाली. त्यानंतर 2021 साली बीडीओ पदी तो नियुक्त झाला. सध्या तो याच पदावर कार्यरत आहे. 5 वर्षे काम केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा विचार केला. त्यानंतर तो सराव पेपर सोडवू लागला. अगदी सुरूवातीपासून सुरूवात करत त्याने मित्रांसोबत मिळून अभ्यास केला.
हेही वाचा : आनंद गगनात मावेना! गावातील एसटी बससेवेला एक वर्ष पूर्ण, गावकऱ्यांनी चक्क केक कापून वाढदिवस केला साजरा VIDEO
अक्षयचे आई-वडील दोघंही शेती करतात. घरची परिस्थिती चांगली आहे. 'पालकांचा उत्तम पाठिंबा मिळाला आणि मित्रांचीही चांगली साथ मिळाली म्हणून मी हे यश मिळवू शकलो', असं अक्षय अभिमानाने सांगतो. तो म्हणाला, 'या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे, एमपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण खचून न जाता आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तसंच यामध्ये अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते. तेव्हा समाजाच्या, नातेवाईकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तसंच पैशांबाबत अडचणी येतात, परंतु या सगळ्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचा अभ्यास करत राहिलं पाहिजे', असा सल्ला अक्षयने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा





