TRENDING:

आधी सौंदर्यानं भुरळ घातली अन् कष्टानं IAS अधिकारी बनली, ऐश्वर्या शेरॉनची Success story

Last Updated:

मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा गाजवलेली ऐश्वर्या आज यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएफएस अधिकारी बनली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कुणाच्या जीवनाला कशी कलाटणी मिळेल, हे सांगणं केवळ अशक्य आहे. आजकाल करिअरच्या बाबतीतदेखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. काही तरुण-तरुणी शिक्षण एका क्षेत्राचं घेतात पण करिअर दुसऱ्याच क्षेत्रात करतात. यात काहींना यश मिळतं तर काहींना अपयश. पण ऐश्वर्या शेरॉनच्या करिअरचा प्रवास वेगवेगळी वळणं घेत झाला आणि शेवटी तिला यशाकडे घेऊन गेला.
ऐश्वर्या
ऐश्वर्या
advertisement

मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा गाजवलेली ऐश्वर्या आज यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएफएस अधिकारी बनली आहे. सौंदर्य स्पर्धेतली फायनलिस्ट ते आयएफएस अधिकारी हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. तिचा प्रवास नेमका कसा होता, ते जाणून घेऊया. `झी न्यूज`ने या विषयीची माहिती दिली आहे.

ऐश्वर्या शेरॉन ही 2016 च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्ट होती. मात्र तिने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 93 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. फॅशन आणि ग्लॅमरच्या दुनियेत ती यशस्वी होईल असे वाटत असताना तिच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. तिने कोणताही औपचारिक कोचिंग क्लास न लावता यूपीएससी परीक्षेत यश मिळावलं. कठोर परिश्रम, दृढ निश्चय आणि प्रतिभा या गुणांच्या जोरावर ती ही परीक्षा उत्तीर्ण झाली.

advertisement

IAS Story : बॉयफ्रेंडबरोबर पेपरात छापला फोटो; UPSCमध्ये झाली नापास, आता IAS बनून सांगितला किस्सा

मॉडेलिंगच्या झगमगाटाच्या दुनियेतून सुरू झालेला तिचा प्रवास भारतीय परराष्ट्र सेवेच्या कार्यालयात येऊन थांबला. ऐश्वर्या ही खऱ्या अर्थाने ‘ब्युटी विथ ब्रेन्स’ या इंग्रजी वाक्प्रचाराचं उदाहरण आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक पाठपुरावा, परिश्रम केल्यास ती खरोखरच सत्यात उतरू शकतात, हे ऐश्वर्याच्या वाटचालीतून दिसतं.

advertisement

यूपीएससीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी ऐश्वर्या ही एक प्रसिद्ध मॉडेल होती. तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील चाणक्यपुरीमधील संस्कृती स्कूलमध्ये पूर्ण झालं. तिला इयत्ता 12 वीला 97.5 टक्के गुण मिळाले. ती शाळेत टॉपर ठरली होती. पुढे ऐश्वर्याने दिल्लीतील प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे ऐश्वर्याच्या आकांक्षांना केवळ ग्लॅमरस दुनियेने मोहीत केलं नाही.

advertisement

Career Tips : पुण्यातल्या 'या' मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यात नोकरी पक्की, 16 लाख मिळेल पगार!

वृत्तानुसार, तिने भारतीय सैन्यात सेवा करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. मूळची राजस्थानची असलेली ऐश्वर्या करिमनगरच्या नवव्या तेलंगणा एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर अजय कुमार यांची मुलगी आहे. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्कराशी संबंधित होती. त्यामुळे देशसेवेशी संबंधित करिअरमध्ये ती नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल.

advertisement

ऐश्वर्याचा यूपीएससी रँकपर्यंतचा प्रवास सौंदर्य स्पर्धेतील चमकदार यशापासून सुरू झाला. 2016 मध्ये तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपला ठसा उमटवला. 2015 मध्ये तिने ‘मिस दिल्ली’ हा किताब पटकवला होता. तिथून तिच्या ग्लॅमर क्षेत्रातल्या प्रवासाची यशस्वी वाटचाल सुरू झाली होती. 2014 मध्ये तिने ‘मिस क्लीन अँड केअर फ्रेश फेस’ हा किताब देखील मिळवला होता.

ऐश्वर्याची कहाणी देशभरातल्या असंख्य इच्छुकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा स्रोत आहे. जिद्द, कठोर परिश्रम, उत्कृष्टतेसाठी समर्पण करून मोठी स्वप्न साध्य करता येतात हे तिच्या वाटचालीतून दिसते. रनवे ते पॉवर कॉरिडॉरपर्यंतचा तिचा प्रवास ब्युटी विथ ब्रेन ही संकल्पना अधोरेखित करतो. ऐश्वर्या आयएफएस अधिकारी म्हणून डिप्लोमसीच्या जगात तिची पावलं टाकत असताना तिची यशोगाथा दृढता, महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी घेतलेले परिश्रम याचा पुरावा आहे.

मराठी बातम्या/करिअर/
आधी सौंदर्यानं भुरळ घातली अन् कष्टानं IAS अधिकारी बनली, ऐश्वर्या शेरॉनची Success story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल