Career Tips : पुण्यातल्या 'या' मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यात नोकरी पक्की, 16 लाख मिळेल पगार!

Last Updated:

विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी 28 लाख रुपयांचा बाँड भरून घेतला जातो. कोर्स किंवा सैन्य दल सोडल्यास 28 लाख रुपये भरपाई द्यावी लागते.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
पुणे, 10 ऑक्टोबर : डॉक्टर होण्याचे अनेक मार्ग आहेत; पण भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून काम करण्यात जे साध्य होतं ते इतरत्र कुठेही साध्य होत नाही. भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून काम करताना देशसेवेची संधी, उत्तम पगार, सैन्याधिकारी पदाचा दर्जा आणि सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. यामुळेच सैन्यात डॉक्टर बनण्याची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे.
भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून रुजू होण्यासाठी पुण्यातल्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून (एएफएमसी) एमबीबीएस हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. एएफएमसीचा एमबीबीएस अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा आहे. त्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते. एएफएमसी मेडिकलच्या पदवीपूर्व अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट परीक्षा आणि मानसशास्त्रीय मूल्यांकन चाचणी (पीएटी) उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.
एएफएमसीमधून एमबीबीएस कोण करू शकतं?
एएफएमसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेत किमान 50 टक्के गुण असणं आवश्यक आहे. बीएस्सीनंतर प्रवेश घेणाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 24 वर्षं आहे. तसंच अर्जदार अविवाहित असणं आवश्यक आहे. वयाबद्दल बोलायचं झालं तर ते 17 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावं. याशिवाय इयत्ता बारावीला इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये किमान 60 टक्के गुण असावेत. कोणत्याही विषयात 55 टक्क्यांपेक्षा कमी गुण नसावेत.
advertisement
एएफएमसीमध्ये किती असतात एमबीबीएसच्या जागा?
एएफएमसीमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी एकूण 145 जागा असतात. त्यापैकी 115 जागा पुरुषांसाठी, तर 30 जागा महिलांसाठी असतात. 145 जागांपैकी पाच जागा परदेशी विद्यार्थ्यांसाठी, 10 एससी आणि एसटी प्रवर्गासाठी राखीव असतात.
सैन्यात होता येतं डॉक्टर म्हणून भरती
एएफएमसीमधून एबीबीएस केल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सशस्त्र दलात कमिशन्ड ऑफिसर म्हणून काम करणं बंधनकारक असतं. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी 28 लाख रुपयांचा बाँड भरून घेतला जातो. कोर्स किंवा सैन्य दल सोडल्यास 28 लाख रुपये भरपाई द्यावी लागते.
advertisement
सैन्यातल्या डॉक्टरला मिळतं इतकं वेतन
एएफएमसीमधून एमबीबीएस केल्यानंतर सैन्यदलात डॉक्टर म्हणून रुजू व्हायला लागतं. सैन्यात डॉक्टरला कमाल वार्षिक वेतन 16 लाख रुपये असतं. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर सैन्यात सर्वप्रथम कॅप्टन पदावर नियुक्ती होते. त्यानंतर मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर जनरल, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल या पदांवरून व्यक्ती जनरल रँकपर्यंत पोहोचते. जनरल पदावरच्या व्यक्तीला दरमहा कमाल वेतन 1,89,600 रुपये असतं.
मराठी बातम्या/करिअर/
Career Tips : पुण्यातल्या 'या' मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यात नोकरी पक्की, 16 लाख मिळेल पगार!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement