पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) चीफ मॅनेजर - 21 पदे
शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA पूर्ण असावे. तसेच 7 ते 8 वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
2) सिनियर मॅनेजर - 85 पदे
advertisement
शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA उत्तीर्ण असावे. तसेच 5 वर्षे अनुभव असावा.
3) लॉ ऑफिसर – 17 पदे
शैक्षणिक पात्रता : विधी पदवी (LLB) असणे आवश्यक असून 4 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.
4) मॅनेजर – 57 पदे
शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA पूर्ण असावे. तसेच 3 वर्षे अनुभव अपेक्षित आहे.
दरम्यन, वरील पदांकरिता किमान वयोमर्यादा 28 वर्षे आणि कमाल 45 वर्षे आहे.
एक Video व्हायरल आणि पुरतं बदललं आयुष्य, 21 वर्षीय तरुणी करतेय बक्कळ कमाई!
परीक्षा शुल्क
या पदांसाठी, अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर सामान्य आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. शुल्क फक्त मास्टर/व्हिसा/रुपे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट्स, क्यूआर किंवा यूपीआय वापरून भरता येईल.
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा – ज्यामध्ये इंग्रजी, व्यावसायिक ज्ञान आणि सामान्य ज्ञान असे विभाग असतात.
मुलाखत – ऑनलाइन परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अंतिम गुणवत्ता यादी – दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीवर आधारित.
अर्ज कसा करायचा?
बँक ऑफ इंडियाच्या www.bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ‘करिअर’ विभागावर क्लिक करा आणि संबंधित भरती सूचना निवडा. वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसह नोंदणी करा. ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे (छायाचित्र, स्वाक्षरी, प्रमाणपत्र) अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज पुष्टीकरण डाउनलोड करा आणि प्रिंट करा.