कोल्हापूर : सोशल मीडियाकडे मनोरंजन आणि कनेक्ट राहण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं. यामुळे गेल्या काही वर्षांत फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि ट्विटर युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा मिळवत असलेल्यांची संख्याही वाढत आहे. या क्षेत्राकडे करियरचा पर्याय म्हणून देखील पाहिलं जातंय. परंतु, खरंच डिजिटल माध्यमांत पूर्णवेळ करियर होऊ शकतं का? आणि यामध्ये किती संधी आहेत? याबाबत लोकल18 ने कोल्हापुरातील डिजिटल माध्यम क्षेत्रातील जाणकार सुमित कदम यांच्याशी संवाद साधला आहे.
advertisement
डिजिटल मीडियातील करिअरची संधी
आज-काल डिजिटल मीडिया हे क्षेत्र काहीजण करियर म्हणून निवडत आहेत. यात कंटेंट क्रिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्याचं पाहायला मिळत आहे. युट्युब इंस्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवरून कंटेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये करिअर करता येऊ शकते. येत्या काही वर्षात कंटेंट क्रिएशनची बूम मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसह स्पॉटिफाय आणि ब्लॉगिंग मध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असं सुमित कदम यांनी सांगितलं.
'मोठं मोठं बोलून होत नसते क्रांती..' अस्सल कोल्हापुरी गली बॉय, एकदम नादखुळा VIDEO
तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा
गेल्या काही वर्षात झालेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा सध्याच्या युवापीढीला मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत. त्याचबरोबर बदलते ट्रेंड ओळखता येण महत्त्वाचं ठरणार आहे. ब्लॉगिंग मुळे देखील रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर ब्लॉगिंग च्या माध्यमातून जाहिरातीचे नवे पर्व देखील सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपण दैनंदिन आयुष्य, संस्कृती, खाद्य संस्कृती तुमच्या आजूबाजूचा परिसर लोकांना दाखवून पैसे मिळवू शकता.
इंस्टाग्रामवरून जाहिराती
इन्स्टाग्राममधील रील्सच्या माध्यमातून देखील कन्टेन्ट क्रिएशन करता येऊ शकते. हे माध्यम करिअरसाठी उपयुक्त आहे. सध्या इन्स्टाग्रामला फार मोठी डिमांड असल्याचं दिसून येतंय. सध्याच्या युवा पिढीमध्ये इन्स्टाग्रामबद्दल फार मोठं आकर्षण असल्याचं दिसून येतं. यात विविध प्रकारचे ब्रँड देखील आपल्या जाहिरातीसाठी रिल्सना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे यामाध्यमातून देखील चांगले पैसे मिळवता येऊ शकतात, असं कदम सांगतात.





