या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 मार्च 2025 पासून सुरू होईल. या भरतीअंतर्गत 650 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदावारांना लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Job Opportunity: नोकरीची संधी सोडू नका! एसटी महामंडळात मेगा भरती, लगेच करा अर्ज
advertisement
आवश्यक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 01.03.2000 पूर्वी आणि 01.03.2005 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखा समाविष्ट). तसेच नियमानुसार वयात सवलत मिळेल.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी आणि त्यानंतर ऑनलाइन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत असेल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. उमेदवाराने चुकीच्या उत्तर दिलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी, योग्य गुण मिळविण्यासाठी त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांमधून एक चतुर्थांश किंवा 0.25 गुण दंड म्हणून वजा केले जातील
अर्ज शुल्क किती?
एससी/एसटी/अपंग उमेदवारांना 250 रुपये फक्त सूचना शुल्क भरावे लागेल. तर, इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1050 रुपये असणार आहे. स्क्रीनवर विचारलेली माहिती देऊन डेबिट कार्ड (रुपे/व्हिसा/मास्टरकार्ड/मास्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट्स वापरून पेमेंट करता येईल.