या भरती मोहिमेच्या माध्यमातून सेंट्रल बँक ऑफ इंडिया 484 सफाई कर्मचारी, सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी पदे भरणार आहे. आज (9 जानेवारी 2024) अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करणं गरेजचं आहे. 18 ते 26 वर्षे वयोगटातील उमेवदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
advertisement
अर्ज शुल्क
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 2024 भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असेलल्या ओपन कॅटेगरीतील सर्व महिला व पुरुष उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आलं आहे. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/ईएक्सएसएम उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.
दूधाला भाव मिळाला नाही, गड्यानं स्वत:चीच डेअरी टाकली, आज 1500 शेतकऱ्यांसोबत करतोय काम, लाखोंची कमाई
निवड प्रक्रिया
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारांना भारत सरकारच्या आरक्षण धोरण आणि नियमांनुसार संधी दिली जाईल. उमेदवाराला आयपीबीएसने आयोजित केलेली ऑनलाइन परीक्षा आणि बँकेने आयोजित स्थानिक भाषा परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सर सोराबजी पोचखानवाला आणि सर फिरोजशाह मेहता यांनी 21 डिसेंबर 1911 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना केली होती. ही भारतातील पहिली व्यावसायिक आणि पूर्णपणे भारतीय बँक होती. या बँकेचं मुख्यालय मुंबई येथे आहे.
100 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरात चार हजार 594 शाखा होत्या. सध्या बँकेच्या 600 शाखा कार्यरत आहेत. मार्च 2023 पर्यंत बँकेने आपल्या अनेक शाखा इतर शाखांमध्ये विलीन केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांना या शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.