राज्यातील सर्व अनुदान पात्र शाळांना बायोमॅट्रिक हजेरी प्रणालीचा वापर करावा लागेल. ही अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देखील निश्चित मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल, असा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. सर्व शाळांना बायोमेट्रिक मशिन देण्यात आल्या असून शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची देखील बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्येच निर्देश दिले आहेत.
advertisement
दहावी, बारावीचा निकाल यंदा लवकरच जाहीर होणार, शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली
गुरू अन् शिष्याची बायोमेट्रिकवर हजेरी
आता शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकवर घेतली जाणार आहे. ही हजेरी सर्वांसाठी बंधनकारक असून शाळेला बुट्टी मारणाऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे. तसेच शाळांमधील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची रोजची बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितांना द्यावी लागणार आहे. अपडेट हजेरी दिल्यानंतरच अनुदान मंजुरी, पगार आदींबाबत विचार होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय.
चेहरा दाखवा हजेरी लावा
प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक हजेरीसाठी शिक्षण विभागाकडून मशीन देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चेहरा दाखवून हजेरी लावावी लागणार आहे. त्याशिवाय हजेरी लागणार नाही. बऱ्याचदा शिक्षक आणि कर्मचारी शाळेत न येता आपलं घरगुती काम करत राहतात आणि चुकीच्या मार्गाने हजेरी दिली जाते, अशा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यावर शिक्षण विभागाने काढलेल्या उपायाने अशा शिक्षक, कर्मचाऱ्यांची अडचण होणार आहे.
SSC Hall Ticket: 10 वीच्या विद्यार्थ्यांना 2 दिवसांत मिळणार हॉल तिकीट, SSC बोर्डाने जाहीर केली तारीख
नव्या नियमाची गरज का?
काही शाळांमध्ये विद्यार्थी बऱ्याचदा शाळा बुडवून बाहेर जातात. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत देखील अशाच तक्रारी येत होत्या. मात्र, हजेरी 100 टक्के दाखवली जाते. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आली. त्यामुळे अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे बुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना आता पूर्णवेळ शाळेतच राहावे लागणार आहे.