TRENDING:

दहावी, बारावीचा निकाल यंदा लवकरच जाहीर होणार, शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली

Last Updated:

SSC HSC Result Date: यंदा दहावी-बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत 10 ते 15 दिवस लवकर सुरू होत आहे. त्यामुळे परीक्षेचा निकाल देखील लवकर जाहीर होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. या परीक्षांचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत माहिती दिली.
दहावी, बारावीचा निकाल यंदा लवकरच जाहीर होणार, शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली
दहावी, बारावीचा निकाल यंदा लवकरच जाहीर होणार, शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली
advertisement

यंदा दहावी-बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षांचा निकाल देखील 15 मेपर्यंत जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच या परीक्षांसाठी राज्यभरातून जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

SSC Hall Ticket: 10 वीच्या विद्यार्थ्यांना 2 दिवसांत मिळणार हॉल तिकीट, SSC बोर्डाने जाहीर केली तारीख

advertisement

दरम्यान, यापूर्वी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होत होता. तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्य मंडळाच्या नियोजनामुळे बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केला जात आहे. हे निकाल लवकर जाहीर झाल्याने 11 वी, आयटीआय, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पडण्यास मदत होते.

advertisement

पालक, शिक्षकांचे प्रयत्न महत्त्वाचे

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी अशा सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करणे योग्य ठरणार नाही. ती टिकवण्यासाठीच प्रयत्न करावे लागतील. मात्र, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे. अशा वेळी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. पुरेशी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास चांगला होतो, प्रगती चांगली होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा वेळी समूह शाळांना विरोध करून चालणार नाही. शाळा बंद करण्याऐवजी विद्यार्थी संख्या वाढवण्यावर सरकारचा भर राहणार आहे, असेही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
दहावी, बारावीचा निकाल यंदा लवकरच जाहीर होणार, शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल