नागपूर : जून महिन्यात होणाऱ्या यूजीसीच्या नेट परीक्षेच्या पेपर-1 तयारीसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. 20 ते 25 मे दरम्यान सकाळी 8 ते 11 वाजेदरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतील. त्यांना ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल करवंदे आणि नेट-सेटच्या तज्ज्ञ संगीता खरे यांचं मार्गदर्शन मिळणार आहे.
advertisement
नागपूरमधील स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय, नंदनवन इथं हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी 9923164366 या क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थिनीची मार्कशीट Viral! जिनं घवघवीत यश मिळवलं, तिच पाहायला नाही या जगात
त्याचबरोबर प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत कॉसमॅटोलॉजिस्ट अभ्यासक्रमालादेखील प्रवेश देण्यात येत आहे. कौशल भारत-कुशल भारत या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचा हा अभ्यासक्रम नि:शुल्क असून 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना यात प्रवेश देण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी 9356406638 या क्रमांकावर संपर्क साधावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रमाणित ग्राफिक डिझायनिंग, ऍनिमेशन, फिल्म मेकिंगच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियादेखील सुरू आहे.






