TRENDING:

Railway मध्ये नोकरी करायची सुवर्ण संधी! 3000 जागांवर भरती, पाहा कोण करु शकतं अर्ज

Last Updated:

वेळ आणि ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी अनेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पदाचे अधिकारी दिसत असतील. तुम्हीही कधी रेल्वेमध्ये नोकरी करण्याचा विचार केला असेल किंवा यासाठी सध्या तयारीही करत असाल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 11 डिसेंबर : वेळ आणि ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी अनेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पदाचे अधिकारी दिसत असतील. तुम्हीही कधी रेल्वेमध्ये नोकरी करण्याचा विचार केला असेल किंवा यासाठी सध्या तयारीही करत असाल. सध्या रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांवर भरती होणार आहे. कोण या पदांसाठी अर्ज करु शकतात याविषयी जाणून घेऊया.
Railway मध्ये नोकरी करायची सुवर्ण संधी!
Railway मध्ये नोकरी करायची सुवर्ण संधी!
advertisement

भारतीय रेल्वेने बंपर पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उत्तर रेल्वे (NR) द्वारे एक भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेमध्ये शिकाऊ पदे मोठ्या प्रमाणावर भरली जाणार आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साइट rrcnr.org वर जाऊन अर्ज करू शकतात.

advertisement

Railway Gateman Salary: रेल्वेत गेटमनला किती पगार मिळतो?

या भरती मोहिमेद्वारे रेल्वेमध्ये एकूण 3,093 पदे भरली जातील. ज्यासाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी, 12वी उत्तीर्ण असावा. याशिवाय उमेदवाराकडे आयटीआय उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्रही असावं. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावं.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यासाठीचे शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.

advertisement

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जा. यानंतर उमेदवार होमपेजवरील ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करतात. नंतर उमेदवारासमोर एक लिंक उघडेल, ज्यावर उमेदवार नोंदणी करू शकतो.

नोंदणी केल्यानंतर, उमेदवार लॉगिन करतात आणि अर्ज भरतात.

फॉर्म भरल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज शुल्क भरावे.

त्यानंतर उमेदवार अर्ज सबमिट करतात.

आता उमेदवार अर्ज डाउनलोड करतात.

advertisement

शेवटी, उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट घ्यावी.

मराठी बातम्या/करिअर/
Railway मध्ये नोकरी करायची सुवर्ण संधी! 3000 जागांवर भरती, पाहा कोण करु शकतं अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल