राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, 'भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या 5696 जागा आहेत. 18 ते 30 वयाची मर्यादा आहे. अधिक डिटेल्स या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग यासाठी तत्पर आहेच.'
advertisement
पुढे राज ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर याचा रितसर तपशील लावावा. या विषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे.'
वडील चालवतात इलेक्ट्रॉनिक्स शॉप, मुलगा UPSC च्या परिक्षेत आला देशात पहिला, अत्यंत प्रेरणादायी कहाणी!
कुठे करु शकता अर्ज
विद्यार्थी 15 फेब्रुवारीपर्यंत रेल्वे भरती बोर्डाची वेबसाइट indianrailways.gov.in वर अर्ज करु शकता. भरतीमध्ये 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण होण्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा पूर्ण असलेले किंवा इंजीनियरिंगचा डिप्लोमा मिळवलेले विद्यार्थी सामिल होऊ शकतात.
बोर्डाने जारी केला ऑनलाइन सिलॅबस
या भरतीविषयी बोर्डाने सिलॅबस देखील जारी केला आहे. भरतीसाठी अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 30 वर्ष ठरवण्यात आलंय. जास्तीत जास्त वयामध्ये तरुणांना नियमानुसार सूटचा फायदाही दिला जाऊ शकतो. भरती बोर्डाद्वारे नोटिफिकेशनसह लिखित परीक्षेसाठी ऑनलाइन सिलॅबस देखील जारी करण्यात आला आहे.
photos : ना सरकारी, ना खासगी; मोकळ्या जागेत चालणाऱ्या या मोफत शाळेतील पोरं पोहचले IIT पर्यंत
जाणून घ्या किती द्यावे लागेल अर्ज शुल्क
अर्जासोबतच सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गाच्या अर्जदारांचं शुल्क 500 रुपये तर एससी, एसटी, ईएमएम, महिला आणि ईबीसी वर्गाच्या अर्जदारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये ठरवण्यात आलंय.