photos : ना सरकारी, ना खासगी; मोकळ्या जागेत चालणाऱ्या या मोफत शाळेतील पोरं पोहचले IIT पर्यंत
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, काही ठिकाणी असे आजही दिसत नाही. काही मजबुरीमुळे तर काही वाईट संगतीमुळे शिक्षणापासून दूर राहतात. मात्र, एक जागा अशी आहे, त्याठिकाणी मुलांना शिक्षणाच्या जवळ आणण्यासाठी काही लोक त्यांना केवळ शिक्षणच नाही तर नैतिक ज्ञानही देत आहेत. विशेष म्हणजे येथील विद्यार्थी आयआयटीपर्यंत पोहोचत आहेत. (राधिका कोडवानी, प्रतिनिधी)
मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये आभा कुंज वेलफेअरच्या ओपन स्काय स्कूल चालवली जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहे अशा मुलांनाच येथे शिकवले जाते. योजना क्रमांक 113 मधील पाण्याच्या टाकीखाली 2009 पासून वर्ग सुरू आहेत. याठिकाणी शेकडो बालकांना मोफत शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावले जात आहे. 2009 मध्ये आठ मुलांसह ही शाळा सुरू झाली होती. आज येथील अनेक मुले चांगल्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत, असं संस्थापक ललिता शर्मा सांगतात.
advertisement
आजही येथे शेकडो मुलांना शिकवले जाते. यामध्ये अनेक मुले आहेत जी कधी शाळेतही गेली नाहीत. 15 वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ललिता शर्मा आता आपला पूर्ण वेळ या मुलांना देत आहेत. याठिकाणी दुपारी 2 नंतर वर्ग सुरू होतात आणि रात्री 7-8 वाजेपर्यंत चालतात. मात्र, पावसाळ्यात वर्ग वेगवेगळ्या वेळी घरी होतात. याठिकाणी संगणकासोबतच शिवणकाम आणि कला आणि हस्तकला देखील शिकविली जाते.
advertisement
याठिकाणी पहिली ते बारावीपर्यंत 200 मुले आहेत. तसेच कॉलेजचीही मुलं आहेत. प्रत्येकाला 15 वरिष्ठ आणि 32 कनिष्ठ शिक्षक शिकवतात. मुलांना शिकवणाऱ्या आयकर विभागातील निवृत्त अधिकारी शिल्पांजली शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी नऊ वर्षांपूर्वी याठिकाणी मुलांना शिकवायला सुरुवात केली. मी प्रत्येक वर्गातील मुलांना शिकवते.
advertisement
शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगता येईल, यासाठी संस्थेच्या माध्यमातून जवळपासच्या वस्त्यांना भेट देऊन मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशनही केले जाते. आज संस्थेतून बाहेर पडणाऱ्या अनेक मुलांनी चांगले यश संपादन केले आहे. येथील एक विद्यार्थी आयआयटीपर्यंत पोहोचला. बंगळुरूमधून आयआयटी उत्तीर्ण झालेला येथील विद्यार्थी मोहित कटरे हा एका कंपनीत रुजू झाला आहे. त्याचे पॅकेज 18 लाख रुपये आहे. इथे चौथीत प्रवेश घेतला.
advertisement
अनिता सेठ सांगतात की, शाळेत शिकवल्यानंतर तीही इथे येऊन शिकवते. या मुलांमध्ये खूप हिंमत आहे. म्हणूनच लोक येथे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याबरोबरच आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. गुंजन आणि भाऊ नीरज कुशवाह हे सहाव्या वर्गात शिकतात. ते सरकारी शाळेत शिकतात. आई पाचवी पर्यंत शिकलेली असून एका कंपनीत काम करते. 13 वर्षांच्या गुंजनला डॉक्टर व्हायचे आहे आणि तिच्या भावाला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. गुंजनला 37 पर्यंतचे पाढे पाठ आहेत. दोन्ही भाऊ-बहीण शाळा सुटल्यावर इथे अभ्यासासाठी येतात. तर सायंकाळी 6 नंतर भाजीचे स्टॉल लावले जातात.
advertisement
नीरजने सांगितले की, शाळा सकाळी 7 वाजता सुरू होते. त्यासाठी ते पहाटे पाच ते सहा या वेळेत बाजारात जाऊन भाजी घेऊन येतात. तर दोन भावांसोबत नववीच्या वर्गात शिकणारा विवेक सांगतो की आम्ही तीन आहोत. कुटुंबाची परिस्थिती चांगली नसल्याने येथे शिक्षणासाठी आलो. अभ्यासाबरोबरच स्टेशनरी आणि फीमध्येही मदत मिळते. नुकतेच मला गणित ऑलिम्पियाडमध्ये तिसरे स्थान मिळाले. मला सैन्यात भरती व्हायचे आहे. एका भावाने ठरवले नाही तर दुसऱ्याला डॉक्टर व्हायचे आहे, असे त्याने सांगितले.