जालना: इंजीनियरिंगचा अभ्यास कठीण वाटत असल्याने तब्बल तीन वेळा इंजीनियरिंग सोडली. त्यानंतर वडिलांच्या आग्रहाखातर इंजीनियरिंग पूर्ण केली. जालन्यातील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसेस वर नोकरी देखील मिळवली. मात्र कोरोना आला आणि हातचं सगळं हिरावून घेतलं. हाती असलेली नोकरी गेल्यानंतरही निराश न होता जालना जिल्ह्यातील मानेगावच्या विनोद ढेंगळे यांनी सातत्याने अभ्यास सुरू ठेवला आणि नुकत्याच झालेल्या आयबीपीएस परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर पदाला त्यांनी गवसणी घातलीय.
advertisement
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा
जालना जिल्ह्यातील मानेगाव या छोट्याशा गावातील रहिवासी असलेला विनोद हा सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरी वडिलोपार्जित शेती आहे. मोठ्या संघर्षाने विनोदचे वडील अशोक ढेंगळे यांनी दोन्ही मुलांची शिक्षण पूर्ण केले. विनोदचं प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलं.
पायाभूत शिक्षणाच्या संकल्पातून उभारली संस्था, 50 हजार विद्यार्थी झाले प्रगत PHOTOS
छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॉलेजमध्ये इंजीनियरिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी जालन्यातील एका कंपनीत जॉब मिळवला. मात्र कोरोना आला आणि त्यानंतर त्यांचा जॉब गेला. मात्र हार न मानता त्याने मित्रांच्या सल्लामसलती नंतर बँकिंग परीक्षांची तयारी सुरू केली. सुरुवातीला क्लर्क पदासाठी तयारी करणाऱ्या विनोदचा हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला आणि नुकत्याच लागलेल्या परीक्षेच्या निकालात त्याची विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या मॅनेजर पदी नियुक्ती झाली आहे. विनोदने मिळवलेल्या यशाने त्याची आई वडील अतिशय आनंदी आहेत.
तीनवेळा इंजिनियरिंग सोडलं
तीन वेळा इंजीनियरिंग सोडल्याने माझा आत्मविश्वास पूर्णपणे हरवला होता. मात्र तरीदेखील परिस्थितीने मला मार्ग दाखवला जशी जशी समज येत गेली त्यानुसार मी अभ्यास करत गेलो. सुरुवातीला फक्त क्लर्क होऊन सरकारी नोकरी मिळावी असं वाटायचं. मात्र परीक्षा दिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि नुकत्याच लागलेल्या परीक्षेत माझी मॅनेजर पदी नियुक्ती झाली आहे. या गोष्टीचा माझ्यासह संपूर्ण कुटुंबाला अतिशय आनंद झाला असल्याचं विनोद ढेंगळे सांगतात.
जालन्यात चोरट्यांचा चक्क महापालिकेच्या जेसीबीवर डल्ला; डिझेल भरून आणतो म्हटले अन्...
विनोदच्या यशाचा आनंद
आम्ही सामान्य शेतकरी आहोत घरी वडिलोपार्जित शेती आहे. मात्र दोन्ही मुलांना शिक्षण देऊन स्वयंपूर्ण करण्याची जिद्द होती. विनोदला अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं. त्यानं परिस्थितीवर मात करून आज हे यश मिळवलं आहे. त्याच्या यशाबद्दल आम्हा सगळ्यांना खूप आनंद वाटतो, असं विनोदचे वडील अशोक ढेंगळे यांनी सांगितलं.