जालन्यात चोरट्यांचा चक्क महापालिकेच्या जेसीबीवर डल्ला; डिझेल भरून आणतो म्हटले अन्...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क महानगर पालिकेच्या मालकीचा जेसेबी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
जालना, रवि जैस्वाल प्रतिनिधी : जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क महानगर पालिकेच्या मालकीचा जेसेबी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मात्र त्यानंतर चोरीला गेलेला जेसीबी पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालना महानगर पालिकेचा जेसीबी चोरीला गेला होता. या संदर्भातील तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी पालिकेचा चोरीला गेलेला जेसीबी अवघ्या काही तासांत शोधून काढला आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वसाहती मागे असलेल्या अमृतबन येथे जालना महानगर पालिकेचे जेसीबी ठेवले जातात. या जेसीबीचं संरक्षण करण्यासाठी इथे एका वॉचमनचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
सोमवारी रात्री 8 वाजता काही चोरट्यांनी अमृतबन येथे जाऊन वाॅचमनला पेट्रोल पंप बंद होणार आहेत, जेसीबीत डिझेल कमी असून आम्ही डिझेल भरून आणतो, अशी थाप मारली. त्यानंतर ते जेसीबी घेऊन पसार झाले. जेसीबी चोरीला गेल्याचं लक्षात येताच ही बाब महापालिकेच्या स्वच्छाता कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी जीपीएस प्रणालीद्वारे या जेसीबीचं लोकेशन ट्रॅक केलं. हा जेसीबी त्यांना खादगाव शिवरात आढळून आला. मात्र चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
January 03, 2024 9:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्यात चोरट्यांचा चक्क महापालिकेच्या जेसीबीवर डल्ला; डिझेल भरून आणतो म्हटले अन्...