छत्रपती संभाजीनगर: जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर कोणतंही स्वप्न नक्की पूर्ण करता येतं. मराठवाड्याची कन्या शुभदा पैठणकर हिनं हेच दाखवून दिलंय. शिक्षक कन्या असणाऱ्या शुभदाचं सुरुवातीचं शिक्षण गावातल्या मराठी शाळेत झालं. पण आता आपल्या कर्तृत्वानं तिनं सातासमुद्रपार अमेरिकेत नाव कमावलंय. तिच्या गुणवत्तेमुळं तिला एका नामांकित कंपनीत तब्बल दीड कोटींच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. या कामगिरीमुळे शुभदावर कौतुकाचा वर्षावर होतोय.
advertisement
शिक्षक कन्येची झेप
शुभदा संजय पैठणकर ही मूळची जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहे. शुभदाचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. शुभादाने भोकरदन येथे 10 पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर तिनं 11 आणि 12 वी छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण केलं. पुढे संभाजीनगर शहरातील एका इंजिनिअरिंग कॉलेज मधून तिनं इंजीनियरिंग शिक्षण देखील पूर्ण केलं.
शिक्षक कन्येची सातासमुद्रपार भरारी, अमेरिकेत मिळालं साडेतीन कोटींचं पॅकेज
आई-वडिलांची इच्छा
शुभदाने भविष्यात डॉक्टर व्हावं अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. मात्र तिला इंजेक्शन आणि रक्त बघून भीती वाटत होती. डॉक्टर होऊन रुग्णांना न्याय देऊ शकणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असं ठरवल्याचं शुभदा सांगते.
दीड कोटींचं पॅकेज
नोकरी करत असताना आपल्याला अजून काहीतरी मोठं करायचंय, असं शुभदाला वाटत होतं. तिने अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सिलिकॉन व्हॅली येथे असलेल्या एका नामांकित विद्यापीठामध्ये 'सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्लाऊड अँड वर्चलायझेशन'मध्ये तिनं शिक्षण घेतलं. तिचे हे शिक्षण चालू असताना तिने एका कंपनीमध्ये मुलाखत दिली आणि त्यातून तिची निवड झाली. आता तिला अमेरिकेतील एका नामांकित कंपनीची नोकरी मिळाली असून त्या ठिकाणी दीड कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे, असं शुभदानं सांगितलं.
लहानपणापासून कम्प्यूटरमध्ये आवड
"मला लहानपणापासूनच कम्प्युटरमध्ये आवड होती. म्हणून मी यात शिक्षण घेतलं आणि त्यातून मला आज चांगल्या पगाराची नोकरी भेटली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी माझ्या आई-वडिलांचे यासाठी मनापासून आभार मानते." असं शुभदा म्हणते. तर "आमचा लेकीनं आज जे करून दाखवलेलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रत्येक लेकिन आपल्या आई-वडिलांचे नाव मोठं करावं अशी माझी इच्छा आहे, असं शुभदाच्या आई म्हणतात.