‘मित्र’ या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. याअंतर्गत इस्त्राईल देशामध्ये ‘नॉन वॉर झोन’मध्ये घरगुती सहाय्यक (होमबेस्ड हेल्थ केअर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदावारांना लवकर अर्ज करावा लागेल.
advertisement
फायद्याची शेती! एका एकरात 450 रोपांची केली लागवड, हे झाड करणार शेतकऱ्याला लखपती Video
पात्रता काय?
सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार संधीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांचे वय 25 ते 45 वयोगटात असावे. इंग्रजी भाषेचे सामान्यज्ञान असणारे उमेदवार पात्र असून यासोबतच उमेदवारांकडे काळजी वाहू (घरगूती सहायक) सेवांसाठी निपून/ पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
भारतीय प्राधिकरणाव्दारे मान्यता प्राप्त केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिंस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याबाबततीची तपशीलवार माहिती https://maharashtrainternationl.com या वेबपोर्टलवरील लेटस्ट जॉब या मधळ्याखाली उपलब्ध आहे.
पैशांची नाही तर चक्क पुस्तकांची भिशी, 100 रुपयेच भरा आणि 10 पट जास्त मिळवा पुस्तकं
कसा करायचा अर्ज?
नोकरीसाठी इच्छुकांनी https://maharashtrainternationl.com या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज अशा संबधित संस्थांनी पुढाकार घेऊन इस्त्राईल येथील वैद्यकिय क्षेत्रातील रोजगार संधीबाबत माहिती अधिकाअधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. तसेच संबंधित रोजगार संधीच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही खंदारे यांनी केले आहे.






