स्वप्नील काळे सध्या पीईजी इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग डीएमसीसी, दुबई येथे कार्यरत आहे आणि त्याला वार्षिक 45 लाख रुपयांचे पॅकेज मिळत आहे. त्याचे काका धर्मानाथ काळे देखील दुबईतील पेट्रोकेमिकल कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच स्वप्नीलला आयटीआयमध्ये मेकॅनिकल ड्राफ्ट्समन ट्रेडची माहिती मिळाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले, आणि नंतर पिंपरी-चिंचवड येथील निगडी शासकीय प्रशिक्षण मेकॅनिकल औद्योगिक संस्थेत ड्राफ्ट्समन कोर्ससाठी प्रवेश घेतला.
advertisement
Farmer Success Story: शेतकऱ्याची कमाल, 13 गुंठ्यात केली घेवड्याची लागवड, उत्पन्न मिळणार लाखात! Video
या कोर्सदरम्यान संस्थेतील निदेशक पांडुरंग भालेराव यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आळंदी, भोसरी आणि मुंबईतील विविध कंपन्यांमध्ये मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून कामाचा अनुभव घेतला.
दुबईतील कंपनीत मिळाली संधी
आकुर्डी येथील वाय. बी. पॉलिटेक्निक महाविद्यालयातून मेकॅनिकलमध्ये पदवी संपादन केल्यानंतर, स्वप्नीलने आपल्या सतत शिकण्याच्या वृत्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर दुबईतील जागतिक दर्जाच्या कंपनीत संधी मिळवली. आज तो त्या कंपनीत कायमस्वरूपी कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
स्वप्नील काळे यांनी सांगितले की, “आयटीआयमधील प्रशिक्षणामुळेच मला दुबईत कायमस्वरूपी नोकरी मिळाली. परदेशातही आयटीआयच्या प्रशिक्षणाला मोठे महत्त्व दिले जाते. या वाटचालीत निगडी आयटीआयमधील निदेशक पांडुरंग भालेराव यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांनी केवळ तांत्रिक मार्गदर्शन केले नाही, तर शिस्तही लावली, ज्यामुळे करिअरमध्ये योग्य दिशा मिळाली.”