TRENDING:

Pink e-Rickshaw: पिंक ई-रिक्षा योजना नेमकी काय? कसा होणार महिलांना फायदा, संपूर्ण माहिती

Last Updated:

Pink e-Rickshaw Scheme: पुण्यातील महिलांसाठी सुवर्णसंधी असून राज्य सरकारने पिंक ई-रिक्षा योजना जाहीर केलीये. लाभार्थी महिलांना ही रिक्षा चालविण्यासाठीचे प्रशिक्षण आणि वाहन परवानादेखील मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी (पिंक) रिक्षा खरेदी करण्यास अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने नुकतीच 'पिंक ई-रिक्षा' ही योजना राज्यात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी पालिकेकडून केली जाणार आहे. रिक्षासाठी कर्जाचा व्याजदर देखील कमी असून महिलांनी 5 वर्षांमध्ये महिन्याला 6 हजार रुपयांचा हप्ता भरून याची परतफेड करायची आहे. पिंक ई-रिक्षा योजनेमुळे गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

advertisement

महाराष्ट्र शासनाने पिंक ई-रिक्षा योजना ही विशेष महिलांसाठी लागू केली आहे. यामध्ये पुणे महापालिका शहरासाठी काम करत आहे. यासोबत महिला बालकल्याण, आयसीडीसी प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगर पालिका हे एकत्रित पणे काम करत आहेत. या योजनेमध्ये लाभार्थीचा एक हिस्सा राज्य शासनाचे अनुदान आणि बँकांचे कर्ज या तिन्हींचा समन्वय करून ही योजना राबवली जात आहे.

advertisement

‘PM किसान’साठी आधार, शेतकऱ्यांना देण्यात येणार ओळख क्रमांक, काय आहेत नव्या अटी?

पिंक ई-रिक्षा योजनेचे फायदे 

या रिक्षासाठी भाडे निश्चित करून दिले असून मार्ग देखील निश्चित केले आहे. मेट्रो, गर्दीचे रस्ते, वाहनतळ, रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन, पीएमपी, बस स्टॅन्ड या ठिकाणी लवकर पोहचता यावे, यासाठी या ई-रिक्षांचा उपयोग होणार आहे. फक्त 12 हजार 300 रुपये भरून या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बँकांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता महिन्याला 6 हजार याप्रमाणे फेडता येईल.

advertisement

काय आहेत अटी? 

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 20 ते 40 असलं पाहिजे. त्यांचं बँकेत खातं असावं. वार्षिक उत्पन्न हे 3 लाखा पेक्षा जास्त नसावं. विधवा, कायद्याने घटस्फोट, दारिद्र्य रेषेखालील महिलांना लाभ घेता येणार आहे. अंगणवाडी सेविका, पालिकेच्या समूह संघटिका, समाज विकास, पालिका वॉर्ड 15 इथे अर्ज करता येतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

या रिक्षांची नोंदणी आणि विमा वितरकांकडून मोफत काढला जाणार आहे. तसेच संबंधित लाभार्थी महिलांना ही रिक्षा चालविण्यासाठीचे प्रशिक्षण आणि वाहन परवानादेखील या वितरकांमार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील समाज विकास विभागाच्या कार्यालयात या योजनेची माहिती मिळणार असल्याचे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले.

मराठी बातम्या/करिअर/
Pink e-Rickshaw: पिंक ई-रिक्षा योजना नेमकी काय? कसा होणार महिलांना फायदा, संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल