छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. या भीतीपोटीच बऱ्याचदा इंग्रजी विषयात कमी गुण मिळतात. काहींना तर आपण इंग्रजीत नापास होऊ अशी भीती सतत वाटत असते. 18 फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक महावीर संगवे यांनी माहिती दिलीये.
advertisement
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पेपरला जाताना कुठल्याही प्रकारचा टेन्शन किंवा दडपण घेऊन नये. अगदी शांत डोक्याने पेपरला जावं. जेव्हा तुम्हाला पेपर हातामध्ये दिला जातो तेव्हा सगळ्यात पहिले 5 मिनिटे तुम्ही व्यवस्थित रित्या संपूर्ण पेपर वाचून घ्यावा. त्यानंतर तुम्हाला जे सोपे प्रश्न वाटतात ते सुरुवातीला सोडवायला सुरुवात करावी. ते याकरता की तुम्ही जर आधी सोपे प्रश्न सोडवले तर तुम्हाला अवघड प्रश्नांसाठी जास्त वेळ मिळतो.
Mental Health: आपला स्वभावच सांगतो आपलं मानसिक आरोग्य! तुमच्यात ही लक्षणे तर नाहीत ना?
इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना तुमचा व्याकरणाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्हाला पेपर मध्ये तीन पॅरेग्राफ येतात. त्यामध्ये दोन पुस्तकांमधले असतात आणि एक बाहेरचा असतो. त्याच्या खाली जे प्रश्न येतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही त्यामध्येच असतात. त्यामुळे तुम्ही ते पॅरेग्राफ (उतारे) एकदम व्यवस्थित रित्या वाचून घ्यावेत. म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न लिहिण्यासाठी मदत मिळेल. तसंच पत्रलेखन देखील असतं. जर तुम्ही पत्र लेखनामध्ये अनौपचारिक पत्र लिहिलं तर ते तुम्हाला सोपं जातं. त्यासोबतच सोपा असा निबंध देखील असतो. पेपरवर तुम्हाला नॉन व्हर्बल असतं ते अतिशय सोपा असतं. त्याचा व्यवस्थित अभ्यास करून गेला तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात.
प्रश्नपत्रिकेतील कंपल्सरी प्रश्न तुम्ही सोडवणे गरजेचे आहे. त्यासोबतच नवीन प्रश्न सुरु करताना तो नवीन पानावरती सुरू करावा. एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर त्याकरता तुम्ही जागा सोडून द्यावी आणि दुसरा प्रश्न सोडवावा, अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील, असं शिक्षक महावीर संगवे सांगतात.





