छत्रपती संभाजीनगर : दहावी आणि बारावीची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना खूप जास्त टेन्शन येतं. जर टेन्शन आलं तर विद्यार्थी पेपर देखील नीट लिहीत नाहीत. विद्यार्थ्यांसोबत पालकांना आणि शिक्षकांनी देखील या काळात काही काळजी घेण्याची गरज असते. छत्रपती संभाजीनगर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांनी याबाबतच लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये
advertisement
विद्यार्थी परीक्षेला जाण्याच्या अगोदर पालक विद्यार्थ्यांना खूप अशा सूचना देतात. सगळ्यात पहिले पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अति सूचना देता कामा नये. त्यासोबतच आपल्या मुलाला पालकांनी विद्यार्थ्यांनी त्याने चांगला अभ्यास केलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित रित्या पेपर सोडवू शकतो असा विश्वासा द्यायला हवा. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपली झोप ही पुरेशी घेणे गरजेचे आहे. किमान विद्यार्थ्यांनी 6 ते 7 तास झोप घेणे गरजेचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.
Healthy Diet for Exam: परीक्षेच्या काळात आहारावरही द्या लक्ष, हे खाणं टाळाच!
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कुठलाही नवीन प्रयोग करू नये. म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेणे टाळावे. अगदी मेमरीसाठी गोळी घेणंही टाळलंच पाहिजे. आपलं रोजचं रुटीनच विद्यार्थ्यांनी फॉलो करावं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एका जागी किमान बसण्याची सवय ठेवावी. पेपर सोडवून आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जास्त वेळ त्या पेपरचे डिस्कशन करू नये, असंही डॉक्टर सांगतात.
विशेष करून पालकांनी विद्यार्थी पेपर देऊन घरी आल्यानंतर त्याला त्या पेपर विषयी जास्त प्रश्न विचारू नये किंवा त्यावर जास्त डिस्कस करू नये. कारण यामुळे विद्यार्थी खचून जाण्याची शक्यता असते. अशी काळजी घेतली तर या परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहील आणि ते चांगल्या मनाने आणि चांगल्या मनस्थिती मध्ये ते पेपर देऊ शकतील, असंही मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलंय.





