TRENDING:

चीनमध्ये फ्री शिक्षणाची संधी! मिळेल 34 हजारांचं स्टायपेंड; या स्कॉलशिपसाठी करा अप्लाय

Last Updated:

यंदा द ग्रेड वॉल स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 ही आहे. यामध्ये दोन प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : उच्च शिक्षणाच्या बाबतीत चीन हा अमेरिका युरोपमधल्या अनेक देशांशी स्पर्धा करतो. क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंग 2024मध्ये पहिल्या 10मध्ये चीनच्या चार विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामुळेच भारतातल्यासुद्धा अनेक विद्यार्थ्यांना चीनमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही चीनमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एका उत्तम शिष्यवृत्तीची माहिती सांगणार आहोत. ही शिष्यवृत्ती जर मिळाली तर शिक्षणातलं शुल्क माफ होईल. त्याबरोबरच दरमहा 3000 युआन इतकी आर्थिक मदत आणि राहण्यासाठी स्वस्तात घर देखील मिळेल. द ग्रेट वॉल प्रोग्रॅम असं या शिष्यवृत्तीचं नाव आहे. युनेस्को आणि चीन सरकार मिळून ही शिष्यवृत्ती देत आहेत.
चीनमध्ये फ्रीमध्ये शिक्षण घेण्याची संधी
चीनमध्ये फ्रीमध्ये शिक्षण घेण्याची संधी
advertisement

यंदा द ग्रेड वॉल स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 ही आहे. यामध्ये दोन प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत. जनरल स्कॉलरशिप प्रोग्रॅम आणि सीनिअर स्कॉलरशिप प्रोग्रॅम. जनरल स्कॉलरशिपसाठी हायस्कूल डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे. तसंच वय 45 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच सीनिअर स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. त्यासाठी 50 वर्षांपेक्षा अधिक वय नसावं, अशी अट आहे. अधिक माहितीसाठी स्कॉलरशिप प्रोग्रॅमच्या पोर्टलवर अवश्य भेट द्या.

advertisement

तुम्हालाही मिळू शकते Google मध्ये नोकरी! कसा मिळू शकतो कोट्यवधी रुपये पगार?

द ग्रेट वॉल स्कॉलरशिप प्रोग्रॅमअंतर्गत चीन सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा –

ट्यूशन फी माफ

- जनरल स्कॉलर्सला दरमहा 3000 युआन (जवळपास 34,587 रुपये) आणि सिनिअर स्कॉलर्सला दरमहा 500 युआम (जवळपास 5764 रुपये) स्टायपेंड मिळणार आहे. यामध्ये दैनंदिन खर्च आणि जेवणाचा खर्च कव्हर होऊ शकतो.

advertisement

- कॅम्पसमध्ये अनुदानित वसतिगृहात निवासाची सोय

- वैद्यकीय विमा आणि संरक्षण कवच

job alert : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? इथं मिळेल तब्बल 1.12 लाख पगार, असा भरा अर्ज

युनेस्कोकडून मिळणाऱ्या सुविधा –

- एक राउंड इंटरनॅशनल ट्रिप

- दर महा 80 डॉलरचा पॉकेट अलाउन्स

- घरी परतण्यासाठी 200 डॉलरचा टर्मिनेशन अलाउन्स

advertisement

कशी आहे निवड प्रक्रिया?

या शिष्यवृत्तीसाठीची निवड चीनमधल्या संबंधित विद्यापीठाकडून केली जाईल.

कोणाला करता येईल अर्ज?

- जनरल स्कॉलरशिपसाठी हायस्कूल डिप्लोमा आवश्यक आहे. वय 45 वर्षांपर्यंत असावं.

- सिनिअर स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी पदव्युत्तर पदवी आणि वय 50 वर्षांपर्यंत असावं.

- इंग्रजीवर प्रभुत्व हवं. ज्यांना चिनी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करायचा असेल, त्यांना HSK लेव्हलची चायनीज भाषा येणं आवश्यक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

- शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणं आवश्यक

मराठी बातम्या/करिअर/
चीनमध्ये फ्री शिक्षणाची संधी! मिळेल 34 हजारांचं स्टायपेंड; या स्कॉलशिपसाठी करा अप्लाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल