तुम्हालाही मिळू शकते Google मध्ये नोकरी! कसा मिळू शकतो कोट्यवधी रुपये पगार?

Last Updated:

गुगल कंपनी अप्रतिम ऑफिस आणि उत्तम सॅलरी पॅकेजसाठी प्रसिद्ध आहे; पण गुगलमध्ये नोकरी करणं सोपं नाहीये. यासाठी अनेक कठीण मुलाखती द्याव्या लागतात.

तुम्हालाही मिळू शकते Google मध्ये नोकरी!
तुम्हालाही मिळू शकते Google मध्ये नोकरी!
नवी दिल्ली : प्रत्येक नोकरदाराच्या विशलिस्टमध्ये काही कंपन्या हमखास असतात. गुगलसुद्धा त्यापैकीच एक आहे. गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या युवकांना योग्य दिशा मिळाली तर पहिल्या-दुसऱ्या प्रयत्नातच त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळू शकते. गुगल कंपनी अप्रतिम ऑफिस आणि उत्तम सॅलरी पॅकेजसाठी प्रसिद्ध आहे; पण गुगलमध्ये नोकरी करणं सोपं नाहीये. यासाठी अनेक कठीण मुलाखती द्याव्या लागतात.
गुगलचा इंटरव्ह्यू जगातला सगळ्यात कठीण मानला जातो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण गुगलशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या माहितीनुसार, या मल्टिनॅशनल सर्च इंजिन कंपनीमध्ये दर वर्षी 20 लाखांहून अधिक जण नोकरीसाठी अर्ज करत असतात. त्यातून 5 हजारांपेक्षाही कमी जणांना गुगल नोकरी देतं. गुगलच्या पीपल ऑपरेशन्सचे प्रमुख लेजलो बॉक यांनी एका मुलाखतीत तिथल्या नोकरभरतीबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे तुमचा गुगलमधल्या नोकरीचा मार्ग थोडा सोपा होऊ शकतो.
advertisement
कुठे आहे गुगलचं ऑफिस?
तुम्ही जर गुगलमध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करत असाल तर गुगलचं ऑफिस कुठे आहे, हेसुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोशल मीडियावर गुगलच्या ऑफिसचे फोटो व्हायरल होत असतात. गुगलचं मुख्य कार्यालय अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये आहे. पण त्यांच्या शाखा जगभरात पसरलेल्या आहेत. भारताबद्दल बोलायचं झालं तर देशातल्या 4 मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच, गुरुग्राम, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये गुगलचं ऑफिस आहे.
advertisement
गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करा कराल?
गुगलमध्ये नोकरी करण्यासाठी https://careers.google.com/ या वेबसाइटवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. जेव्हाही गुगलमध्ये नोकरीच्या संधी असल्याचं समजेल तेव्हा आपलं कौशल्य, शिक्षण आणि अनुभवाच्या आधारावर तुम्हाला अर्ज करता येईल. गुगलमध्ये नोकरीसाठी या वेबसाइटवर आपला अर्ज अपलोड करून सगळी आवश्यक माहिती त्यात भरावी. जगभरातल्या काही निवडक विद्यापीठांमधून कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातूनही गुगल सर्वोत्तम उमेदवारांना नोकरीची संधी देत असतं.
advertisement
कसा होतो गुगल इंटरव्ह्यू?
तुमचा नोकरीचा अर्ज पाहिल्यानंतर गुगलला वाटलं की तुम्ही त्यांच्या अपेक्षा आणि वर्क कल्चरसाठी अनुरूप आहात, तर ते टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठी कॉल करू शकतात. गुगल इंटरव्ह्यू जगातला सर्वांत कठीण मानला जातो. गुगल इंटरव्ह्यूमध्ये अनेक प्रकारचे तार्किक, प्रासंगिक आणि विविध आश्चर्यकारक प्रश्न विचारले जातात. गुगल टेलिफोनिक इंटरव्ह्यूनंतर अव्वल उमेदवारांना व्हिडिओ इंटरव्ह्यूसाठी आणि पुढच्या फेरीसाठी बोलावतात.
advertisement
किती पगार मिळतो गुगलमध्ये?
गुगल कंपनी अप्रतिम सॅलरी पॅकेजसाठी प्रसिद्ध आहे. इथे इंटर्न असलेल्यांनासुद्धा लाखांत पगार मिळतो. इंटर्नशिप करणाऱ्या काही उमेदवारांना कोटींच्या घरातही पॅकेज दिलं गेलं आहे. गुगलमध्ये नोकरी करणाऱ्यांना उत्तम पगाराबरोबरच अनेक उत्तम सुविधासुद्धा मिळत असतात. गुगल ऑफिसच्या बिल्डिंगची गणना ही उत्तम वास्तूंमध्ये केली जाते. तिथे दुपारचं तसंच रात्रीचं जेवण, स्नॅक्स, स्पा, रिलॅक्स हाऊस यांसारख्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रजाही खूप मिळतात.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
तुम्हालाही मिळू शकते Google मध्ये नोकरी! कसा मिळू शकतो कोट्यवधी रुपये पगार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement