छत्रपती संभाजीनगर : 'पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया' हे वाक्य आपण सर्वांनी ऐकलेच असेल. जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही हे मात्र निश्चित आहे. तर कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक राजेश हिवाळे हे मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील ढोरेगाव या गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक राजेश हिवाळे हे मुलांना शाळेत आणण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून मोहीम राबवत आहेत. खेडेगावामध्ये उन्हाळी सुट्टीनंतर किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर अनेक मुलं ही शाळेत येत नाहीत. काही मुलं हे त्यांच्या आई-वडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी जातात किंवा काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती नसल्यामुळे ते शाळेत येत नाहीत. यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतच. पण त्यांना भविष्यामध्ये देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठीच राजेश हिवाळे हे या मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करतात.
हॉटेलचा कर्मचारी आता झाला मालक, करतोय वर्षाला 10 ते 15 लाखांची कमाई, बीडच्या नामदेवची कहाणी Video
राजेश हिवाळे हे शेतामध्ये जाऊन वस्त्यांमध्ये जाऊन त्याचबरोबर ऊसाच्या फडामध्ये जाऊन मुलांना समजावून सांगतात. त्यासोबतच मुलांच्या पालकांना देखील समजावून सांगतात. त्यानंतर त्या मुलांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी शाळेमध्ये घालतात किंवा त्यांच्या शाळेमध्ये ते त्यांना ऍडमिशन घेऊन देतात. अशा पद्धतीने ते केल्या 5 वर्षांपासून हे काम करत आहेत. शाळेतील मुख्याध्यापिका त्याचबरोबर इतरही शिक्षक हे त्यांना मदत करतात. राजेश हिवाळे हे जे काम करत आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांच्या या कामाला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
आमच्या शाळेमध्ये जर कोणी दोन दिवस जरी नाही आले तर आम्ही त्यांच्या घरी जातो. बघतो की त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे. आणि त्यानंतर परत मुलांना शाळेत आम्ही घेऊन येतो, असं शिक्षक राजेश हिवाळे सांगतात.





